लोकमत आॅनलाईनधरणगाव/चोपडा, जि.जळगाव, दि. २३ : जळगाव जिल्ह्यातील दोन शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या घटना शुक्रवारी घडल्या. श्याम मोतीलाल भावसार (वय ४८, रा. भावसार गल्ली, धरणगाव) आणि संदीप रमेश बाविस्कर (वय २०, रा.तावसे बुद्रूक, ता.चोपडा) अशी या शेतकºयांची नावे आहेत.धरणगाव येथील भावसार गल्लीतील रहिवासी श्याम मोतीलाल भावसार (४८) हे कर्जबाजारी शेतकरी होते. रेल्वे स्टेशन पलीकडे असलेल्या शेतातील झाडास गळफास घेऊन शुक्रवारी दुपारी चारला त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर गेल्या वर्षभरापासून वि.का.सोसायटीचे अनोरे शिवारातील गट क्र २०/३०/३१ या एकत्रित कुटुंबातील शेतावर जवळपास पावणेदोन लाखाचे कर्ज असून, काही पतसंस्थांचे दोन लाख कर्ज होते. गेल्या महिन्यात त्यांच्या मुलीचे लग्न झाले. शेतात जाण्याच्या बहाण्यान घरातून निघाले व शेतात आत्महत्या केली. अंत्ययात्रा २४ रोजी सकाळी नऊ वाजता निघेल.चोपडाचोपडा तालुक्यातील तावसे बुद्रूक येथील संदीप रमेश बाविस्कर (२०) या युवा शेतकºयाने शेतात झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजले नाही. तो शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी गेला. शेतातील झाडाला दोरी बांधून गळफास घेतला. मयत संदीप हा दररोज रात्री शेतात कांदे व इतर पिकांना पाणी देण्यासाठी तसेच राखण करण्यासाठी जात होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
जळगाव जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:33 IST
धरणगाव आणि चोपडा तालुक्यातील घटना
जळगाव जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
ठळक मुद्दे४८ वर्षीय शेतकºयावर होते चार लाख रुपये कर्ज२० वर्षीय तरुण शेतकºयानेही कवटाळले मृत्यूलाउभयतांच्या कुटुंबीयांतर्फे शोक व्यक्त