शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात दोन नगरसेवकांना डच्चू? प्रा.सुनील नेवे यांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 01:47 IST

इतर नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी येथील उपनगराध्यक्ष व समित्यांचे सभापती हे गेल्या वर्षापासूून बदलण्यात येत आहेत. गेल्या वर्षी स्वीकृत नगरसेवकांना मात्र कायम ठेवण्यात आले होते. त्यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांना ‘एक’ तर ‘नेत्यांना’ वेगळा न्याय का, असा प्रश्न भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी दोन नगरसेवकांना बदलण्यात येणार असून, प्रा.सुनील नेवे यांना मात्र पाच वर्षासाठी कायम स्वीकृत नगरसेवक म्हणून ठेवण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांना मिळावी संधीनगरपालिकेतील सत्ता बदलाचे वारे

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : इतर नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी येथील उपनगराध्यक्ष व समित्यांचे सभापती हे गेल्या वर्षापासूून बदलण्यात येत आहेत. गेल्या वर्षी स्वीकृत नगरसेवकांना मात्र कायम ठेवण्यात आले होते. त्यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांना ‘एक’ तर ‘नेत्यांना’ वेगळा न्याय का, असा प्रश्न भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी दोन नगरसेवकांना बदलण्यात येणार असून, प्रा.सुनील नेवे यांना मात्र पाच वर्षासाठी कायम स्वीकृत नगरसेवक म्हणून ठेवण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.येथील पालिकेची निवडणूक डिसेंबर २०१६ मध्ये झाली. या निवडणुकीत भाजपातर्फे रमण भोळेही जनतेतून लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले, तर नगरसेवकही बहुमताने निवडून आले होते. त्यामुळे त्यावेळी उपनगराध्यक्ष म्हणून युवराज लोणारी यांना संधी देण्यात आली, तर स्वीकृत नगरसेवक म्हणून मनोज बियाणी, चंद्रशेखर अत्तरदे व प्रा.सुनील नावे यांना संधी देण्यात आली.यावेळी पाच वर्षात पाच नगरसेवकांना उपनगराध्यक्ष व सभापती त्याचप्रमाणे स्वीकृत नगरसेवक यांना एक-एक वर्षासाठी संधी देण्यात येणार असल्याची घोषणा त्यावेळी करण्यात आली होती.मात्र गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये उपनगराध्यक्ष लोणारी यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता, तर विषय समित्यांच्या सभापती यांनीही सभापती पदांचे राजीनामे दिले होते. स्वीकृत नगरसेवकांचे राजीनामे मागण्याचे धाडस मात्र त्यावेळी कोणीही दाखवले नव्हते.दरम्यान, या निवडणुकीत भाजपाकडून राजेंद्र आवटे, दीपक धांडे, रेखा सोनवणे हे उमेदवार अल्पशा मतांनी पराभूत झाले होते, तर नगरसेविका प्रतिभा पाटील यांना उमेदवारी देऊन माजी नगरसेवक वसंत पाटील यांना उमेदवारीपासून दूर ठेवण्यात आले होते. तसेच शेखर इंगळे, पवन बुंदेले यांनाही उमेदवारी देण्यात आली नव्हती.दरम्यान, त्या निवडणुकीत धांडे यांच्याविरुद्ध चंद्रशेखर अत्तरदे यांचे शालक मुकेश पाटील हे अपक्ष निवडून आले होते. त्यामुळे धांडे यांच्या पराभवाचे खापर त्यावेळी भाजपाच्याच काही पदाधिकाऱ्यांवर फोडण्यात आले होते. मात्र असे असले तरी त्यांना डावलून अत्तरदे यांना पुन्हा स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्यात आली.दरम्यान, स्वीकृत नगरसेवक अत्तरदे यांच्या पत्नी माधुरी अत्तरदे या भाजपाकडून जि. प. सदस्य म्हणून निवडून आले आहे, तर आई अत्तरदे या भाजपाकडून जळगाव मनपाच्या निवडणुकीत नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहे. पत्नी जिल्हा परिषद सदस्य, तर आई मनपात नगरसेविका, तरीही त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून कायम ठेवण्यात आले आहे.गेल्या २० वर्षांपासून माजी आमदार संतोष चौधरी व अनिल चौधरी यांच्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेणारे माजी नगरसेवक वसंत पाटील, विद्यार्थी सेनेपासून कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे धांडे यांनी भाजपात प्रवेश करूनही त्यांना वंचित ठेवण्यात येत आहे, तर गेल्या कित्येक वर्षांपासून भाजपाचे सेवा करणारे शेखर इंगळे, राजेंद्र आवटे पवन बुंदेले यांनाही संधी देण्यात येत नसल्यामुळे शहरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.दरम्यान, स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्यात आलेले ‘त्रिकूट’ हे अभ्यासू असल्यामुळे व न.पा.तील बैठक सुरळीत चालविण्यासाठी त्यांना घेण्यात आल्याचा दावा त्या वेळी करण्यात आला होता. मात्र गेल्या दोन वर्षात न.पा.च्या बैठका केवळ तीन मिनिटात गुंडाळण्यात येत आहे. त्यामुळे येथे सत्ताधाºयांना कधीच विरोधकांच्या प्रश्नांचा भडीमारासमोर जाण्याची गरजच भासली नाही, तर वंचित राहिलेले कार्यकतेर्ही अभ्यासू असल्याचे त्यांनी नपाच्या सभागृहात तसेच अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. तरीही त्यांना संधी का देण्यात येत नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता.प्रा.नेवे पाच वर्षासाठी स्वीकृतदरम्यान, यावर्षी चंद्रशेखर अत्तरदे व मनोज बियाणी यांच्या जागेवर कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली, तर प्रा.नेवे यांना मात्र पाच वर्षासाठी कायम स्वीकृत नगरसेवक म्हणून ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.बियाणींच्या जागी धांडे, तर अत्तरदेंच्या जागी?दीपक धांडे हे बियाणी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत, त्यामुळे बियाणी हे धांडे यांच्यासाठी राजीनामा देणार होते, अशी चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू होती. त्यामुळे बियाणी यांच्या जागेवर धांडे यांना संधी मिळू शकते मात्र अत्तरदे यांच्या जागेवर कोणाला संधी मिळणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षBhusawalभुसावळ