भुसावळ : शहरातील खडका रोड भागातील तरुणाजवळून दोन गावठी पिस्तूल जप्त केले. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी ही कारवाई केली. याबाबत बाजारपेठ पोलीस रात्री उशिरापर्यंत अनभिज्ञ होते. तर गेल्या काही दिवसांपासून गावठी पिस्तूल शहरात सापडले नव्हते. मात्र सोमवारच्या खूनाच्या घटनेनंतर गावठी पिस्तूल सापडल्याने खळबळ उडाली आहे.मुस्लीम कॉलनीतील रहिवासी सैयद कलीम सैयद जावीद (वय २१) याच्या जवळ गावठी पिस्तूल असल्याची माहिती हवालदार शरिफोद्दीन काझी, पोलिस नाइक युनुस शेख यांना मिळाली. त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अलफरान मशिद कॉम्प्लेक्स जवळ सैय्यद कलीम सैय्यद जावीद यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, ४० हजार रुपये किंमतीचे दोन गावठी पिस्तूल मिळून आल्याने त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी. जी. रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शरीफोद्दीन काझी, नाईक शेख युनूस शेख रसुल, महेश आत्माराम महाजन आदींनी कारवाई केली.
दोन गावठी पिस्तूल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 22:16 IST