शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

आयपीएलवर सट्टा खेळणा-या दोघांना अटक

By admin | Updated: May 9, 2014 09:35 IST

रिंगरोड भागातील जुने समाजकल्याण कार्यालयासमोरील इमारतीत आयपीएल (इंडियन प्रिमिअर लिग) वर सट्टा खेळणार्‍या दर्शन नरेंद्र धाडीवाल (वय-२३) व उमेश गौतम जैन (वय-२२, दोघे रा.जळगाव) यांना गुरुवारी रात्री जळगाव पोलिसांनी अटक केली आहे.

जळगाव : शहरातील रिंगरोड भागातील जुने समाजकल्याण कार्यालयासमोरील इमारतीत आयपीएल (इंडियन प्रिमिअर लिग) वर सट्टा खेळणार्‍या दर्शन नरेंद्र धाडीवाल (वय-२३) व उमेश गौतम जैन (वय-२२, दोघे रा.जळगाव) यांना गुरुवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली. या दोघांकडून चार मोबाईल, टी.व्ही., सेट टॉप बॉक्स व काही रजिस्टर जप्त केले आहेत. या प्रकरणाशी संबधित दोघांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांना गुरुवारी होत असलेल्या हैद्राबाद विरूद्ध राजस्थानच्या सामन्यावर स˜ा बेटींग घेण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी साहाय्यक निरीक्षक किरण शिंदे, गणेश कदम, गिरधर निकम, कर्मचारी विजय पाटील, बंडू पटवर्धन, बापूराव भोसले, चंद्रकांत पाटील, दिनेश बडगुजर, सुभाष मिस्तरी, नरेंद्र वारुळे, शशीकांत पाटील, जयंत चौधरी यांच्यासह कर्मचार्‍यांचे पथक तयार केले.या पथकाने रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास रिंगरोड जवळील भगवान आरडे यांच्या मालकीच्या इमारतीवर धाड टाकली. दुसर्‍या मजल्यावरील दोन खोल्यांमध्ये काही विद्यार्थी अभ्यास करीत होते तर दुसर्‍या खोलीत दोघे जण समोर सुरु असलेल्या हैद्राबाद विरुद्ध राजस्थानच्या सामान्याचे ऑनलाईन स˜ा बेटींग घेत होते.पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी एकाच वेळी धाड टाकल्याने या ठिकाणी गोंधळ झाला. पोलिसांनी खोलीतील सर्वांचे मोबाईल ताब्यात घेतले. दर्शन नरेंद्र धाडीवाल (वय-२३) व उमेश गौतम जैन यांच्याकडून रजिष्टर ताब्यात घेतले. या रजिष्टरवर हैद्राबाद विरूद्ध राजस्थानच्या सामन्यावर लावलेल्या ३२ हजार ४०० रुपयांचे आकडे तसेच नफा व तोटा किती याचा हिशोब लिहीलेला होता.-------------सामना सुरु झाला त्यावेळी हैद्राबाद संघावर ७० पैसे तर राजस्थान संघावर ७५ पैसे लावले होते. या दोघांनी आयपीएलच्या स˜ा बेटींगवर धु्रव आणि सागर मुंदळा नामक तरुणाच्या सहभागाची कबुली दिली आहे.