शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

'हार्डवेअर'च्या दुकानात डल्ला मारणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:18 IST

जळगाव : मटन मार्केट येथील न्यू अशोक हार्डवेअर दुकानात डल्ला मारणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. दिलीप वसंत ...

जळगाव : मटन मार्केट येथील न्यू अशोक हार्डवेअर दुकानात डल्ला मारणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. दिलीप वसंत सोनवणे (वय २५) व विशाल युवराज सोनवणे (२४, दोन्ही रा. तंट्याभिल सोसायटी, मटन मार्केटजवळ) अटक केलेल्या चोरट्यांची नावे असून, त्यांच्याकडून २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

भुसावळातील सिंधी कॉलनीतील रहिवासी जितू आहुजा यांचे मटन मार्केट येथे न्यू अशोक हार्डवेअर नावाचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी या दुकानात डल्ला मारून सुमारे ९६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरी करून पोबारा केल्याची घटना १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता उघडकीस आली होती. त्यानंतर आहुजा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाल्याचे पोलिसांना आढळून आले होते. त्या आधारावर पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला होता.

तंट्याभिल सोसायटीतून अटक

दरम्यान, हार्डवेअरच्या दुकानात डल्ला मारणारे दोघे मटन मार्केटजवळील तंट्याभिल सोसायटी येथील असल्याची माहिती गुरुवारी जिल्हापेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार रात्रीच दिलीप सोनवणे व विशाल सोनवणे या चोरट्यांना तंट्याभिल सोसायटी येथून सापळा रचून पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २२ हजार ५०० रुपये किमतीच्या स्टील डोअर किट, कडी-कोयंडा, हॅण्डल व दरवाजा स्टॉपर हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पेठ पोलीस ठाण्यातील तुषार जावरे, मनोज पवार, फिरोज तडवी, महेंद्र बागुल, संतोष सोनवणे, महेंद्र पाटील, जुबेर तडवी, माधव कांबळे, विनोद पाटील, अमित मराठे, रिहान खान यांनी केली.