शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
2
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
3
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
4
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
5
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
6
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
7
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
8
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
9
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
10
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
11
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
12
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!
13
चला हवा येऊ द्या! CHYD चं नवं शीर्षक गीत रिलीज; कॉमेडीच्या गँगवॉरची झलक बघा
14
मस्क अजूनही नंबर १, पण झुकरबर्गला बसला मोठा धक्का! AI च्या कामगिरीने 'हा' उद्योगपती झाला जगात दुसरा श्रीमंत!
15
IND vs ENG: शुभमन गिलने कोहलीसारखा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करू नये, माजी क्रिकेटपटूचा महत्त्वाचा सल्ला!
16
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
17
"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
18
कमाल! १ मार्काने नापास झाली पण रडत नाही बसली; जिद्दीने अभ्यास करून स्वप्न केलं साकार
19
ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर

बारावी परीक्षेबाबत तत्काळ धोरणात्मक निर्णय घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दहावीची परीक्षा रद्द झाली. पण, बारावीची परीक्षा होणार आहे किंवा नाही हे अद्याप स्पष्ट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दहावीची परीक्षा रद्द झाली. पण, बारावीची परीक्षा होणार आहे किंवा नाही हे अद्याप स्पष्ट नाही. परिणामी, विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्यामुळे राज्य शासनाने तत्काळ धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी जुक्टो संघटनेच्यावतीने करण्‍यात आली आहे.

मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले असून कुठेही इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा, महाविद्यालय सुरू होऊ शकले नाही. शैक्षणिक कामकाज ऑनलाइन झाले. तसेच शहरी विभागातील ७० टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यासक्रमाचा स्वीकार केला. परंतु ग्रामीण भागामध्ये अल्प प्रतिसाद मिळाला. बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमही ऑनलाइन पध्दतीने पूर्ण करण्‍यात आला. पण, दुसरी लाट आल्यामुळे बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. पण, राज्याच्या आठ विभागांमध्ये अजून बारावी परीक्षेबाबत कुठलाही निर्णय नसल्यामुळे पालक व विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे राज्यशासनाने बारावीच्या परीक्षा संदर्भात शिक्षक, पालक, विद्यार्थी, शिक्षण तज्ञ या सर्वांचे मत जाणून घेऊन परीक्षा कशा पद्धतीने घ्यावयाच्या या संदर्भात तत्काळ धोरणात्मक निर्णय घ्यावा. परीक्षेची पद्धत मूल्यमापनाचे निकष, मौखिक व प्रात्यक्षिक बहुपर्यायी प्रश्नांचे स्वरूप या संदर्भात सविस्तर खुलासा करावा, अशी मागणी शासनाकडे जुक्टो संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील सोनार, सचिव शैलेश राणे, कार्याध्यक्ष सुनील पाटील, नंदन वळींकार, ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील गरुड, डी.डी. पाटील, उपाध्यक्ष प्रा.राजेश बडगुजर, प्रा.संजय चौधरी, प्रा.संजय पाटील, प्रा.पी.पी. पाटील, प्रा.राजेंद्र चव्हाण, प्रा.भारती महाजन आदींनी केली आहे.