शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

मुदतीआधीच तूरडाळ खरेदी केंद्र बंद

By admin | Updated: April 20, 2017 00:29 IST

चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी संतप्त : रोज वेगवेगळी कारणे दाखवून चालढकल

चाळीसगाव : गेल्या पाच दिवसापासून तूर डाळ खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. केंद्राच्या गेटला कुलूप असल्याने  शेतकºयांचा माल गेटबाहेरच पडून आहे. शिवाय दररोज या  ठिकाणी चोºयाही होत आहेत.  त्यामुळे आपापला माल सांभाळण्यासाठी शेतकरी भर ऊन्हात पाच दिवसापासून येथेच तळ ठोकून होत आहेत. या सर्व कारणांमुळे शेतकरी हैराण झाला आहे. तूर डाळ खरेदी करण्यासाठी शासनाने २२ एप्रिलपर्यंत मुदत जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराजवळ  तूरडाळ खरेदी केंद्र सुरु केले आहे. १५ रोजी शेतकºयांनी तूरडाळ खरेदी केंद्रात विकण्यासाठी आणली. या दिवशी बारदान नाही म्हणून तूरडाळ खरेदी झाली नाही. यानंतर दुसºया व तिसºया दिवशी बारदान येऊनही खरेदी झाली नाही. चवथ्या व पाचव्या दिवशी कर्मचारी नाही या कारणावरून खरेदी बंद ठेवण्यात आली. दररोज वेगवेगळी कारणे दाखवून हे केंद्र बंद राहात असल्याने शेतकºयांना आपला माल सांभाळण्यासाठी भर उन्हात व रात्रभर पहारा देत थांबावे लागले. १९ रोजी तूरडाळ केंद्राला प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता  या केंद्राच्या गेटलाच कुलूप ठोकलेले होते. तेथे एकही अधिकारी अथवा कर्मचारी, हमालदेखील नव्हता.  रोज वेगवेगळी कारणे सांगून केंद्र बंद ठेवून चालढकल केली जात आहे. यामुळे शेतकºयांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पाच दिवस उलटूनही कोणीही याची दखल घेतलेली नाही. अजून किती दिवस केंद्र सुरू होण्याची वाट पाहायची असे सांगून शेतकºयांनी या कारभाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.पाच दिवसापासून शेतकºयांचा माल उघडा पडून आहे. त्यामुळे चोरीचे प्रमाणही वाढले आहे. शेतकºयांच्या मालाला संरक्षण नाही. आधीच १५-२० दिवसापासून तापमानात दिवसागणिक वाढ होत आहे. त्यात या मालाच्या संरक्षणासाठी भर उन्हात शेतकºयांना जागता पहारा द्यावा लागत आहे. पाच दिवसात एकही पदाधिकारी, कार्यकर्ता तेथे फिरकला नाही.  शेतकºयांचे कैवारी असल्याचा आव आणायचा मात्र शेतकºयांच्या अडचणीला कोणीही पुढे आले नाही याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. आमदार उन्मेष पाटील यांच्याकडे धावकृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किशोर पाटील यांना हा प्रकार कळताच त्यांनी याबाबत शेतकी संघ अधिकारी यांच्याशी चर्चा केली . नंतर ही बाब आमदार उन्मेष पाटील यांच्या लक्षात आणून दिली. त्यांच्याच भ्रमणध्वनीद्वारा अनेक शेतकºयांनी आपली कैफियत मांडली. तहसीलदार यांना तत्काळ घटनास्थळी पाठवून प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन आमदार पाटील यांनी शेतकºयांना दिले.नायब तहसीलदारांची धावनायब तहसीलदार विशाल सोनवणे हे बुधवारी दुपारी दीड वाजेनंतर केंद्रात दाखल झाले.  त्यांनी शेतकी संघाचे  कारकून विकास पाटील यांची कानउघाडणी केली आणि केंद्राच्या गेटला असलेले  कुलूप  उघडण्यास सांगितले. नंतर लगेच शेतकºयांचा मोजण्यास सांगितले परंतु कर्मचारी व हमाल नाही.  गुरुवारी शेतकºयांचा माल मोजला जाईल असेही सांगण्यात आले. व्यापाºयांची लिंक२०-२५ व्यापारी कार्यरत असताना लिलाव प्रक्रियेत मात्र दोनच व्यापारी  शेतकºयांचा माल  घेतात. इतर व्यापारी येत नसले तरी ते परस्पर या दोघा व्यापाºयांशी संगनमत करुन परस्पर मालाची वाटणी  करून घेतात. अशा प्रकारे व्यापाºयांची लिंक लावली आहे. शेतकºयांचा माल लिलावाद्वारे घेत असल्याचा आरोप अनेक शेतकºयांनी केला आहे.                                      (वार्ताहर)