शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

जळगावात खुन्नस दिल्याच्या संशयावरुन ट्रकची तोडफोड

By admin | Updated: April 16, 2017 17:34 IST

चालकाला मारहाण. दुचाकीस्वाराने कट मारुन ट्रकला केला ओव्हरटेक

 जळगाव,दि.16- ट्रकला कट मारुन पुढे गेलेल्या दुचाकीस्वाराने आपल्याकडे खुन्नसने पाहून इशारा केल्याच्या संशयावरुन ट्रकच्या काचा फोडून चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजता महामार्गावर मानराज पार्कजवळ घडली. या घटनेत दुचाकीस्वार फरार झाला असून ट्रक रामानंद नगर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. जखमी ट्रक चालकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वरणगाव येथील चालक मुस्तफा खान जहांगीर खान (वय 25 ) हा तरुण ट्रक (क्र.एम.एच.18 एम.3723) घेऊन वरणगाव येथून बांभोरी येथील जैन इरिगेशन कंपनीत माल भरण्यासाठी जात असताना महामार्गावर मानराज पार्कजवळ समोरुन दुचाकीवर दोन जण आले. दोन्ही बाजूंच्या वाहनातून मार्ग काढून दुचाकीस्वार पुढे गेला. दोन्ही वाहनांच्या जात असताना कट लागला असता या उद्देशाने दुचाकीस्वाराने मागे फिरुन ट्रक चालकाला इशारा केला. त्यावर मुस्तफा खान यानेही बाहेर हात काढून दुचाकीस्वाराला इशारा केला. आपल्याला वाईट हेतून इशारा केल्याच्या संशयावरुन दुचाकीस्वार मागे फिरुन आला. मानराज चौकात थांबलेल्या दहा ते बारा जणांना बोलावून घेत ट्रकवर हल्ला केला. दोन्ही बाजुचे काच फोडून चालकाला खाली खेचले व बेदम मारहाण  केली.