शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर ट्रकची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2017 00:30 IST

चालकाला मारहाण : कट मारुन ओव्हरटेक

जळगाव : ट्रकला कट मारुन पुढे गेलेल्या दुचाकीस्वाराने आपल्याकडे  पाहून इशारा केल्याच्या संशयावरुन ट्रकच्या काचा फोडून चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजता महामार्गावर मानराज पार्कजवळ घडली. या घटनेत दुचाकीस्वार फरार झाला असून ट्रक रामानंद नगर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. जखमी ट्रक चालकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.वरणगाव येथील चालक मुस्तफा खान जहांगीर खान (वय २५ ) हा तरुण ट्रक (क्र.एम.एच.१८ एम.३७२३) घेऊन वरणगाव येथून बांभोरी येथील जैन इरिगेशन कंपनीत माल भरण्यासाठी जात असताना रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास महामार्गावर मानराज पार्कजवळ समोरुन दुचाकीवर दोन जण आले. दोन्ही बाजूंच्या वाहनातून मार्ग काढून दुचाकीस्वार पुढे गेला.  यावेळी  कट लागला असता दुचाकीस्वाराने मागे फिरुन ट्रक चालकाला इशारा केला. त्यावर मुस्तफा खान यानेही बाहेर हात काढून दुचाकीस्वाराला इशारा केला. आपल्याला वाईट हेतून इशारा केल्याच्या संशयावरुन दुचाकीस्वार मागे फिरुन आला. मानराज चौकात थांबलेल्या दहा ते बारा जणांना बोलावून घेत ट्रकवर हल्ला केला. दोन्ही बाजुचे काच फोडून चालकाला खाली खेचले व बेदम मारहाण करायला सुरुवात केली.चालक जखमी होऊन ट्रकचे नुकसान झाल्याने पोलीस येण्याच्या आत मारहाण करणारे घटनास्थळावरुन पसार झाले होते. चालकाला दुचाकीचा क्रमांकही सांगता येत नाही व वर्णनही व्यवस्थित सांगता येत नाही, त्यामुळे त्यांचा शोध घेणे जिकरीचे झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर चालकाचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते.ट्रक जाळण्याचा प्रयत्न ट्रक चालकाला मारहाण होत असताना काही जण ट्रकची तोडफोड करीत होते तर काही जण ट्रक जाळण्याची भाषा करीत होते. त्यासाठी डिझेल टाकी फोडण्याचा प्रयत्न झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पेठ व रामानंद नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने ट्रक पेटविण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान, यावेळी महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी ट्रक रामानंद नगर पोलिसात नेला. त्यानंतर चालकाला जिल्हा रुग्णालयात हलविले.