शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

ट्रक आणि कंटनेरचा अपघात, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:12 IST

भुसावळ/ दीपनगर : वरणगावकडून भुसावळकडे येणाऱ्या वाशिम -सुरत या लक्झरी बसला कंटेनरची धडक बसल्याने झालेल्या अपघातात सुरत येथील ...

भुसावळ/ दीपनगर : वरणगावकडून भुसावळकडे येणाऱ्या वाशिम -सुरत या लक्झरी बसला कंटेनरची धडक बसल्याने झालेल्या अपघातात सुरत येथील एक प्रवासी ठार झाला तर नऊ जण जखमी झाले. हा अपघात ३ रोजी रात्री सव्वाबाराच्या सुमारास वरणगावजवळील कपीलनगर वस्तीजवळ झाला. ही धडक एवढी जोरात होती की, लक्झरी बसचा बराचशा भागाचा अक्षरश: चुराडा झाला. सध्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून वेळोवेळी वळण रस्ते केले जात असल्यामुळे अनेक वाहनांना अंदाज येत नाही. वरणगावकडून भुसावळकडे एकतर्फी सुरू असलेल्या रस्त्यावरून वाशिमकडून सुरतला लक्झरी बस( क्रमांक जी जे-१७-ओयू-०३४) ने येत असलेला कंटेनर (क्रमांक सीजी-०४-००५९) याच्यात जोरदार धडक झाली. हा आवाज इतका मोठा होता की, परिसरातील रहिवासींच्या मनात धडकी भरली होती. लक्झरी बसमध्ये गाढ झोपेत असलेले सैय्यद अकबर सैय्यद उस्मान(५०, मिठी खाडी, उधना सुरत, गुजरात) यांचा मृत्यू झाला. जखमींना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे.दरम्यान रात्री घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी व सहकाऱ्यांनी धाव घेतली व अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.

महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच

चिखली ते तरसोद दरम्यान महामार्गावर गेल्या पंधरा दिवसात तब्बल चौदा ते पंधरा लोकांना अपघातामुळे आपला जीव गमवावा लागला. आहे. या कालावधीत सिंधी कॉलनीतील दोन सख्ख्या भावांचा तर ग्रीन पार्क येथील दोघा जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. महामार्ग प्राधिकरणाने ठिकठिकाणी उड्डाणपुलावर असलेले पथदिवे त्वरित सुरू करावे व व़ळण रस्त्याच्या ठिकाणी जोपर्यंत काम पूर्ण होत नाही. रात्रीच्या वेळेस कर्मचारी नियुक्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

अपघातप्रकरणी सैय्यद फारूख सैय्यद उस्मान (रा.मिठी खाडी, सुरत) यांच्या फिर्यादीनुसार कंटेनर चालक कुलदीपसिंग विरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातातील जखमींची नावे

१) शेख सुभान शेख उस्मान (वय ५८रा. मालदा, जि. अकोला) २) तुळशीराम अंबर बठेरे (वय ५५, रा. मंगळूरपीर, जि.वाशिम)

३) अरविंद प्रवीण डोंगरे (वय १९रा. मजलापूर, जि. अकोला) ४) परीक्षित साहेबराव डोंगरे (वय २०, रा. मजलापूर, जि. अकोला)

५) विमल ज्ञानदेव गिरे (वय ४३ रा. निमगाव, जिल्हा बुलडाणा)

६) लक्झरीचा क्लिनर विशाल एकनाथ बाविस्कर (वय २१, रा. घाटना दरा, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) (लक्झरी क्लिनर).

७) जगदीश भारत मेश्राम (वय १९ल रा. दारव्हा, जि. यवतमाळ)

८)लक्झरी चालक अशोक नथ्थुलाल पटेल (वय ४०, रा. सुरत)

९) शेख रिजवान शेख अब्दुल (वय २१ रा. खामगाव, जि. बुलडाणा)

फोटो : 04 एचएसके 02

मयत : सय्यद अकबर सय्यद उस्मान

फोटो : 04 एचएसके 0३

अपघात ग्रस्त वाहने