शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी अपघातात दुचाकीस्वार फुटबॉलसारखे उडून खड्ड्यात आदळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:33 IST

फोटो क्र.२३,२४ जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. त्यात मालवाहू वाहनाने दुचाकीला ...

फोटो क्र.२३,२४

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. त्यात मालवाहू वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक देऊन हे वाहन समोरून येणाऱ्या ट्रकवर धडकले. त्याच्या धडकेत दुचाकीस्वार फुटबॉलसारखे उडून थेट झाडाझुडपातील खड्ड्यात आदळले. या अपघातात अशोक सुखदेव रोकडे (रा.पिंप्राळा) व पंढरी नामदेव नन्नवरे (रा.बांभोरी, ता.धरणगाव) हे जखमी झाले आहेत. या प्रकरणात ट्रकचालकासह क्लिनरला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेबाबत माहिती अशी की, एसटी परिवहन मंडळातील सेवानिवृत्त निरीक्षक पंढरी नामदेव नन्नवरे शुक्रवारी सकाळी बांभोरी येथून दुचाकीने (क्र. एमएच १९ एडब्लू ९१०२ ) आहुजानगर येथे येत होते. त्यांच्या पाठोपाठ मालवाहू वाहन (क्र.एमएच १९ एस ६७५७) जळगावकडे येत होते. या वाहनाने ओव्हरटेकच्या नादात समोर नन्नवरे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यानंतर मालवाहू वाहन समोरून पाळधीकडे जात असलेल्या ट्रकवर (क्र.यूपी ७२ एटी ३५६५) धडकला. जोरदार धडकेमुळे दुचाकीवरून नन्नवरे हे फुटबॉलसारखे उडून रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात झाडाझुडपांमध्ये पडले. तर त्यांची दुचाकी ट्रकवर जाऊन लटकली होती. ट्रकवर आदळलेल्या मालवाहू वाहनाचा चक्काचूर झाला होता.

पोलिसांमुळे वाचले प्राण

दरम्यान, हा अपघात झाला तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेचे विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, राजेंद्र पवार, प्रीतम पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील हे तपासासाठी एरंडोलकडे जात होते. अपघात पाहून त्यांनी वाहनात अडकलेल्या अशोक रोकडे यांना वाहनाचा दरवाजा तोडून बाहेर काढून पोलीस वाहनातूनच रुग्णालयात दाखल केले, तर अपघातावेळी बांभोरी येथील नागरिक जळगावकडे येत असताना त्यांनी अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वार पंढरी नन्नवरे यांना ओळखले. त्यांनी तत्काळ रिक्षातून शहरातील रुग्णालयात दाखल केले. त्यांचीही प्रकृती चिंताजनक असून, उपचार सुरू आहेत. अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच काही काळासाठी वाहतूक खोळंबली होती. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला केले. तसेच वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी तालुका पोलिसांनी ट्रकसह चालक तसेच क्लिनरला ताब्यात घेतले आहे.