शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चोपड्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 20:58 IST

वैजापूर येथील अत्याचाराचा निषेध : आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, तहसीलदारांना निवेदन

चोपडा : तालुक्यातील वैजापूर येथे दोन अल्पवयीन आदिवासी बहिणींवर १३ रोजी रात्री देवेंद्र मोरे याने अमानुष लैंगिक अत्याचार केले. त्याच्या निषेधार्थ तसेच दोषीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करीत आदिवासी विद्यार्थी संघटनेतर्फे शहरात मोर्चा काढण्यात आला.घटनेतील आरोपी मोरे यास लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी तहसीलदार अनिल गावित यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.१३ रोजी वैजापूर येथे रात्री सात व पाचवर्षीय अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली.याविरोधात १४ रोजी आदिवासी विद्यार्थ्यांनी चोपडा येथे शासकीय निवास स्थानापासून तहसील कार्यालयावर मूकमोर्चा नेला. अत्याचार करणाऱ्या देवेंद्र मोरे याला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर जामसिंग बारेला, दारासिंग पावरा, माजी पंचायत समिती सभापती गोपाल सोनवणे, समाधान सपकाळे, समाधान सोनवणे, जेमराय पावरा, नामसिंग पावरा, दिनेश पावरा, साहेबराव पावरा, महेंद्र पावरा, संजय पाडवी, देवळा पावरा, अंजली पावरा, बबिता पावरा, गीता पावरा, भारती पावरा, सुनीता पावरा, रंजना पावरा, कालुसिंग पावरा यांच्या सह्या आहेत.याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल करीत आहेत. या कृत्याने तालुक्यासह जिल्हाभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजबांधवांतून विविध स्तरांवर निषेध व्यक्त होत आहे.२० पर्यंत कोठडीआरोपीस अमळनेर येथील विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश पळसपगार यांनी त्यास २० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.