वरखेडी ता. पाचोरा : भोकरी शेत शिवारात जागतिक पर्यावरणाच्या आदल्या दिवशी बांध निष्काळजीपणे पेटवल्यामुळे भलेमोठे निंबाचे जिवंत ,डेरेदार,हिरवेगार झाड पेटून जमिनदोस्त झाले.
भोकरी शेत शिवारात पाचोरा-जामनेर रोडला लागून असलेल्या शेताच्या बांधावर जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षे जिवंत जुने डेरेदार निंबाचे भलेमोठे झाड शेजारच्या शेतकऱ्याने बांधावरील कचरा पेटवल्यामुळे जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला पेटून जमिनदोस्त झाले.
शासन एकीकडे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ चा नारा देते व सर्व प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी संदेश देते व याबद्दल सर्व तऱ्हेने पर्यावरण वृद्धीसाठी सर्वतोपरी जनजागृती करीत असते. परंतु तरीही बरेच शेतकरी याचे गांभीर्य न जाणता निष्काळजीपणे बांधावरील कचरा पेटविण्याच्या नादात अशी बरीचशी डेरेदार वृक्षवल्ली घालवीत असतात. थोड्याशा लालसेपायी बांधावरील वन संपत्ती पेटवून नाहीशी करतात तर काही शेतकरी लाकूड व्यापाऱ्यांना उभेच्या उभे जिवंत डेरेदार वृक्ष विकत असतात. जोवर याबाबत शेतकरी बांधव गंभीरपणे वागणार नाहीत, तोवर हे असेच चालत राहणार, शेतकऱ्यांनी थोड्याशा पैशांचा हव्यास सोडला तर रस्त्यांवर भल्यामोठ्या वृक्षांच्या लाकडांची वाहतूक दिसणार नाही, अशी खंत पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.
===Photopath===
030621\03jal_1_03062021_12.jpg
===Caption===
निष्काळजीपणे बांध पेटवल्याने झाडही भस्मसात