शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खान्देशातील ‘महसूल’च्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 12:15 IST

भुसावळचे प्रांताधिकारी धुळ््याचे भूसंपादन उपजिल्हाधिकारी : नंदुरबारच्या तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या, डीएसओपद रिक्त, धुळ््याचे भूसंपादन उपजिल्हाधिकारी नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी

जळगाव : निवडणुकीशी संबंधित पदे भरणे तसेच प्रशासकीय कारणांमुळे खान्देशातील महसूल विभागातील अधिकाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली असून यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील सहा अधिकाºयांचा समावेश आहे. यात भुसावळचे प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांची धुळे येथे भूसंपादन उपजिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. तसेच जळगावचे भूसंपादन अधिकारी रामसिंग सुलाने यांची भुसावळ येथे प्रांताधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. या सोबतच नंदुरबार जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी व शहादा प्रांताधिकारी यांची बदली झाली आहे. जिल्हा पुरवठा अधिकाºयांच्या जागी मात्र कुणाचीही नियुक्ती नसल्याने हे पद रिक्त राहणार आहे. धुळ््याच्या भूसंपादनच्या उपजिल्हाधिकाºयांचीही बदली झाली आहे.शासनाने शुक्रवारी उशिरा नाशिक विभागातील महसूलच्या अधिकाºयांचे बदली आदेश काढले. यामध्ये नंदुरबारचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांची श्रीरामपूर, जि.अहमदनगर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी गोगटी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहाद्याचे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांची चाळीसगाव येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी चेतन गिरासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी विजय भांगरे यांची बागलानच्या उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी कुणाही अधिकारीची नियुक्ती झालेली नाही.जिल्ह्यातून बदलून जाणाºया तिन्ही अधिकाºयांना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात निरोप देण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड व सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.जळगाव जिल्ह्यातील भुसावळचे प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांची धुळे येथे भूसंपादन उपजिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. तसेच जळगावचे भूसंपादन अधिकारी रामसिंग सुलाने यांची भुसावळ येथे प्रांताधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.धुळे येथील भूसंपादन उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांची नाशिक येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.अठरा हजार कर्मचाºयांची माहिती मागविलीअधिकाºयांच्या बदल्या होण्यासह जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील अकराही विधानसभा क्षेत्रात होणाºया निवडणुकीसाठी कर्मचाºयांची माहिती मागविली असून त्यांची नियुक्ती विधानसभेच्या कामासाठी करता येणार आहे.जिल्हा प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ३० आॅगस्टला मतदानाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. दुसरीकडे मतदानासाठी लागणाºया यंत्रातील (ईव्हीएम मशिन) जुना ‘डेटा क्लिअर’ करून ती यंत्रे पुन्हा राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांच्या उपस्थितीत ‘सील’ करून ‘स्ट्रॉंगरूम’मध्ये ठेवली आहेत. आता विधानसभानिहाय मतदारसंघात मतदान केंद्रांची निवड करणे, तेथे सोयी-सुविधा उपलब्ध करणे याबाबत नियोजन सुरू आहे.एका मतदान केंद्रात किमान पाच कर्मचारी याप्रमाणे जिल्ह्यातील अकरा मतदान केंद्रांमध्ये, सोबतच मतदान प्रक्रियेच्या इतर कामासांठी सुमारे अठरा हजार कर्मचाºयांची माहिती त्या- त्या विधानसभा क्षेत्रातील तहसील कार्यालयात ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू आहे. आचारसंहिता जाहीर होताच संबंधितांना नियुक्तीबाबत पत्रे पाठविली जाणार आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव