भुसावळ : मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून भुसावळसह अनेक स्थानकांवर रेल्वेगाड्यांचा खोळंबा मंगळवारी पहाटेपासून झाला आहे. दुपारपर्यंत काही गाड्या जागीच होत्या. यामुळे वैतागलेले प्रवासी भुसावळ येथे रेल्वेलाईनवर मोठ्या संख्येने उतरले व आमचीच गाडी प्रथम सोडा अशी मागणी करु लागले. यामुळे बराच वेळ गोंधळ निर्माण झाला. या परिस्थितीपुढे रेल्वे प्रशासनही हतबल झाले आहे. गोदान, महानगरी, पुष्पक, वाराणसी- कुर्ला या चार गाड्या भुसावळच्या चार फलाटांवर दुपारी चाडेचार वाजेपर्यंत थांबूनच होत्या. मार्ग जसजसा सुरळीत होईल, तशा एकेक गाड्या सोडण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
भुसावळ स्थानकावर अनेक तासांपासून रेल्वेगाड्या खोळंबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 16:30 IST