शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
6
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
7
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
8
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
9
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
10
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
11
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
12
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
13
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
14
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
15
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
16
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
17
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
18
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
19
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
20
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

भुसावळ जंक्शनवरून प्रत्येक दहा मिनिटाला धावतेय एक रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 3:53 PM

भुसावळातून प्रतिदिन पंधरा हजार प्रवासी करतात प्रवास

ठळक मुद्देभुसावळ स्थानकावरून एका तासात धावतात दहा मालगाड्याभुसावळ-जळगाव दरम्यान २८ स्वयंचलित सिग्नलस्वंयचलित सिग्नल प्रणालीमुळे गाड्यांच्या संख्येत वाढभुसावळ जंक्शनच्या आठ फलाटांवर वर्दळ

पंढरीनाथ गवळी /आॅनलाईन लोकमतभुसावळ,दि.१ : मध्यरेल्वेत मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर आणि भुसावळ असे पाच विभाग आहेत. या पाचही विभागासह भारतीय रेल्वेत भुसावळ रेल्वे विभाग आणि स्थानकाला मोठे महत्त्व आहे. देशातील सर्वच भागात या स्थानकातून प्रवासी गाड्या धावत असतात. २४ तासात भुसावळ रेल्वे स्थानकावरुन तब्बल १३५ प्रवासी गाड्या धावतात. तर एका तासात आठ ते दहा मालगड्या येथून धावत असतात,अशी माहिती रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी दिली.

सर्वच दिशांना प्रवासी गाड्याभुसावळ रेल्वे स्थानकावरुन प्रवाशाला देशातील कोणत्याही भागात जायचे असेल तर त्याला जाता येते. या स्थानकावरुन मुंबई (पश्चिम), (उत्तर) नागपूर (कोलकात्ता), (पूर्व), चेन्नई (दक्षिण) व पुणे, गुजरात यासह राजस्थानात जाण्यासाठी भुसावळ येथून रेल्वेची सोय आहे. येथून मेल/एक्स्प्रेससह वेगवान, अतिवेगवान शिवाय दुरांतो सारख्या गाड्या धावत असतात.भुसावळ जंक्शनच्या आठ फलाटांवर वर्दळभुसावळ रेल्वे स्थानकावर सध्या एकूण आठ फलाट आहेत. त्यापैकी फलाट क्रमांक दोन सध्या तांत्रिक कारणांनी बंद आहे. सात फलाट कार्यान्वित आहेत. यातील फलाट क्रमांक चार, सहा, सात आणि आठवरुन नागपूर, चेन्नई, दिल्ली, पंजाब या भागात जाणाºया प्रवासी गाड्या सोडल्या जातात. फलाट क्रमांक एक आणि तीनवरुन मुंबई, पुणे, अहमदाबाद, गोवा या भागातील प्रवाशी गाड्या धावतात. दरम्यान, भुसावळ रेल्वे स्थानकावर आणखी एका फलाटाची उभारणी केली जाणार आहे. त्याला दोन वर्षापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. आठ फलाटांचे वैभव असलेल्या आणि ‘ए’ श्रेणीतील भुसावळ रेल्वे स्थानकावरुन रोज १५ हजार प्रवासी प्रवास करीत असतात.सेंट्रल रेल्वेत अशा आहेत सिग्नल पद्धती...सेंट्रल व अन्य रेल्वेतील सिग्नल पद्धती या प्रमाणे आहेत. यात पूर्ण ब्लॉक पद्धतीची सिग्नल यंत्रणा. दुसरी स्वयंचलित (अ‍ॅटोमॅटिक पद्धती) व तिसरी पद्धत एक गाडी पद्धती सिग्नल यंत्रणा अशा तीन पद्धतीच्या सिग्नल प्रणालीच्या सहाय्याने रेल्वे गाड्यांचे परिचालन केले जाते.स्वंयचलित सिग्नल प्रणालीमुळे गाड्यांच्या संख्येत वाढभुसावळ-जळगाव दरम्यान, स्वयंचलित सिग्नल प्रणाली कार्यान्वित आहे. त्यामुळे या २५ कि.मी.च्या मार्गावर एका तासात सुमारे १३ प्रवासी गाड्या व मालगाड्या चालविल्या जात आहेत. पूर्ण ब्लॉक व एक गाडी पद्धतीच्या सिग्नल प्रणालीमुळे केवळ दोनच गाड्या जाऊ व येऊ शकतात. त्यामुळे या यंत्रणेचा फायदा होत आहे.भुसावळ-जळगाव दरम्यान २८ स्वयंचलित सिग्नलभुसावळ-जळगाव या २५ कि.मी.अंतरासाठी २८ स्वयंचलित सिग्नल ठेवण्यात आले आहेत. यात भुसावळ-भादली सात. भादली-जळगाव-सात आणि परत जळगाव-भादली-सात व भादली-भुसावळ-सात असे २८ स्वयंचलित सिग्नल आहेत.

 भुसावळ रेल्वे स्थानक मध्य रेल्वेतील एक महत्त्वाचे स्थानक आहे. या स्थानकावर सध्या एकूण आठ फलाट आहेत. त्यातील सात फलाट कार्यान्वित आहेत. या स्थानकावर आणखी एका फलाटाची उभारणी केली जात आहे. हे स्थानक मध्य रेल्वेतील ‘ए’ श्रेणीत मोडले जाणार आहे. पिण्याच्या पाण्यासह, स्वच्छता आणि प्रवासी गाड्या वेळेवर सोडणे या कामाना सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे.- सुनील मिश्रा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, डीआरएम कार्यालय, भुसावळ.

टॅग्स :BhusawalभुसावळRailway Passengerरेल्वे प्रवासी