शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.च्या धडकेने रेल्वे गेट तुटले

By admin | Updated: February 2, 2017 01:11 IST

जळगाव : चोपडय़ाला जाणा:या एस.टी.बसने सुरत रेल्वे गेटला धडक दिल्याने गेट तुटले

जळगाव : चोपडय़ाला जाणा:या एस.टी.बसने सुरत रेल्वे गेटला धडक दिल्याने गेट तुटले व त्यामुळे तब्बल चार तास वाहतुकीचा खोळंबा होण्यासह पश्चिम मार्गावर जाणा:या व येणा:या अनेक प्रवाशी एक्सप्रेस व मालगाडय़ांना विलंब झाला. बुधवारी सकाळी साडे आठ वाजता हा अपघात झाला. नवजीवन व हावडा-अहमदाबाद या दोन गाडय़ांना या अपघाताचा जास्त फटका बसला. दरम्यान, याप्रकरणी बस चालक संजय पुंडलिक पाटील (वय 38 रा.गोरगावले बु.ता.चोपडा) व वाहक विजय गोपीचंद पवार (वय 40) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.

चोपडा आगाराची जळगाव-चोपडा ही बस (क्र.एम.एच.40 एन.9864) सकाळी सुरत मार्गावरील दूध फेडरेशनजवळील रेल्वे गेटजवळ पोहोचली. मात्र त्याचवेळी नवजीवन एक्सप्रेस येत असल्याचा सिगAल मिळाल्याने गेटमन ललित गौतम यांनी गेट बंद केले. हे गेट बंद होण्याआधी बस अंतर पार करेल या अंदाजाने चालकाने पहिले गेट ओलांडले, परंतु दुस:या गेटला वरच्या दिशेने धडक बसल्याने जोडपासून गेट तुटले.नवजीवन एक्सप्रेस थांबली एक तास4गेट ला धडक दिल्यानंतर एस.टी.बसमध्येच अडकल्याने नवजीवन एक्सप्रेसला मालधक्कयाजवळच थांबविण्यात आले. सहायक अभियंता ए.बी.कोलते व सहका:यांनी तातडीने घटनास्थळ गाठून गेट दुरुस्तीचे काम हाती घेतले. एक तासानंतर बसला बाहेर काढण्यात आले व त्यानंतर नवजीवन एक्सप्रेस पुढच्या मार्गावर रवाना झाली. याचवेळी अपलाईनवर ताप्तीगंगा एक्सप्रेस व दोन मालगाडय़ा तसेच डाऊन लाईनवर हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस व दोन मालगाडय़ांना विलंब झाला होता.चार तास वाहतुकीची कोंडीया अपघातामुळे दोन्ही बाजुंनी चार तास वाहतुकीची कोंडी झाली होती. रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक ओ.पी.कुलदीप, हेडकॉन्स्टेबल रंगलाल जाधव व चंदनसिंग यांनी दोन्ही बाजुची वाहतुक सुरळीत केल्यानंतर चार तासांनी वाहतूक पूर्वपदावर आली. दरम्यान, बस चालक संजय पाटील व वाहक विजय पवार यांच्याविरुध्द रेल्वे सुरक्षा बलात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना भुसावळ येथील रेल्वेच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची वैयक्तिक जामीनावर सुटक करुन 15 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिल्याची माहिती उपनिरीक्षक कुलदीप यांनी ‘लोकमत’ ला दिली.