शहरं
Join us  
Trending Stories
1
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
2
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
3
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
4
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
5
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
8
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
9
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
10
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
11
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
12
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
13
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
14
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
15
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
16
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
17
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
18
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
19
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
20
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

इच्छापूरकरांनी उभारला श्रमदानातून तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2017 01:07 IST

150 हेक्टर जमीन सिंचनाखाली : अंतिम टप्प्यातील काम पूर्ण, परिसरातील विहिरींची जलपातळी वाढली

हरताळे/इच्छापूर: मध्य प्रदेशातील प्रसिद्ध इच्छादेवी मंदिराच्या पूव्रेस तीन कि.मी. अंतरावर देव्हारी तलावाच्या  पाझरत्या पाण्यावर येथील ग्रामस्थांनी खालच्या पाझरणा:या पाण्यावर पुन्हा बजरंगी पाझर तलाव स्व-मेहनतीने श्रमदान करीत उभारला असून परिसरातील सुमारे 150 हेक्टरवरील जमीन सिंचनाखाली आली आह़ेतलावाच्या भरावाची रुंदी 60 फूट तर उंची 30 फूट, लांबी सुमारे 200 फूट आहे. दोन ट्रॅक्टर व एक जेसीबीच्या माध्यमातून येथे गेल्या महिन्यापासून भराव टाकण्याच्या कामास प्रारंभ झाला आह़े  काही अंतरावर असलेल्या देव्हारी तलावाचे पाझरणारे लाखो लीटर पाणी वाया जात होते. त्यावर गावक:यांनी शक्कल लढवित स्वयंप्रेरणेने योगदान देत या पाझर तलावाची उभारणी केली आहे. त्यामुळे उभारलेल्या तलावालगतच्या  विहिरींची पाणी पातळी वाढलेली आहे. टय़ुबवेलचेही पाणी वाढल्याचा परिणाम या तलावाचा जाणवत आहे.  त्यामुळे शेतक:यांच्या चेह:यावर चैतन्य निर्माण झाले आहे. या शेतक:यांनी घेतला पुढाकारगेल्या दोन वर्षापूर्वी वाया जाणा:या पाण्यासंदर्भात येथील शेतकरी तुकाराम महाराज भजनी मंडळ, ग्रामस्थ सुरेश वामन महाराज, अनिल धोंडू सपकाळ, साहेबराव कडू तायडे, नगिन बापूराव पंडित, सोपान सीताराम पंडित, श्रीराम वसंत तायडे, दादाराव रामभाऊ पंडित, सुधाकर सीताराम दाभाडे, बापू कडू पंडित, पंडित रामकृष्ण बोदडे, अरुण रमेश तांदुळलीकर, गणेश रमेश सपकाळ, दीपक कोंडे आदींनी ट्रॅक्टर, जेसीबी, डिङोलची रक्कम गोळा करून गावक:यांसह तलाव बांधला आहे. पाच वर्षापूर्वीचा तलावगेल्या पाच वर्षापूर्वी म.प्र. शासन जलधन संधान योजना भाग ब:हाणपूर अंतर्गत आमदार अर्चना चिटणीस व खासदार नंदकुमार सिंह चव्हाण यांनी सुमारे 669.24 लाख रुपये खर्चून देव्हारी तलाव बांधला होता. मात्र खाली पाझरणारे पाणी आवाक्याबाहेरचे असल्याने त्याच्याखाली दोन बांध टाकल्यानंतर देखील लाखो लीटर पाणी तापी नदीत वाहून वाया जात होते. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत बजरंग पाझर तलाव उभारला आह़े  (वार्ताहर) पाणी टंचाईवर मात दरवर्षी येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. मात्र या पाझर तलावावर श्रमदानातून बांध टाकल्याने अडलेल्या पाण्यामुळे येथील पाणीटंचाई दूर होणार असल्याचे शेतक:यांनी सांगितले.परिसरातील सुमारे 15 ते 20 विहिरीची पाणी पातळीही वाढल्याने ग्रामस्थांनी केलेल्या या स्तुत्य श्रमदानाला प्रतिसाद मिळत आहे.  इच्छा असेल तर मार्ग दिसेलचा प्रत्यय येथील शेतक:यांना आला असून श्रमदानातून तलाव बांध करणे हे एकीचे बळ असल्याचा प्रत्यय इच्छापूरकरांना आला आहे. श्रमदानातून नालाबांध मुख्य तलावाखाली दोन बांध बांधून देखील नाल्याचे पाणी वाया जाते त्याठिकाणी ग्रामस्थांनी नालाबांध टाकून श्रमदान केले आहे. म.प्र.शासन स्तरावरून येथील मुख्य तलावासाठी अनुदान मंजूर करून वाया जाणा:या पाण्याचे नियोजन व देव्हारी तलावाची पुन्हा दुरुस्ती करावी, अशी आशा व्यक्त केली जात आह़े विहिरींच्या जलपातळीत वाढ, सिंचन वाढले4श्रमदानातून उभारलेल्या बजरंगी पाझर तलावामुळे परिसरातील शेतक:यांच्या विहिरींच्या सिंचन पातळीत मोठी वाढ झाली आहे. शिवाय सुमारे 150 हेक्टर शेतीलादेखील त्याचा फायदा होणार असून उत्पन्नात मोठय़ा प्रमाणावर वाढ होणार आह़े