धरणगाव : शहरातील सोनवद रस्त्यालगत बेलदार मोहल्ल्याजवळ नवीन शौचालयाचे बांधकाम सुरू आहे; परंतु या शौचालयालागूनच उर्दू शाळा आहे. यामुळे विद्यार्थांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार आहे.
विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणात शाळेचा परिसर नेहमी निसर्गरम्य व आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असला पाहिजे; पण या उलट शाळेला लागून शौचालय बांधल्यामुळे दिवसभर विद्यार्थ्यांना दुर्गंधीला सामोरे जावे लागेल. काही सुज्ञ लोकांनी शौचालय स्थलांतरित करण्याची विनंती पालिका पदाधिकाऱ्यांना केली होती; पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
गेल्या २० वर्षांपासून त्या ठिकाणी शौचालय होते. ते शौचालय पडक्या अवस्थेत असून त्या ठिकाणी नवीन शौचालय बांधण्याचे काम सुरू आहे.
-नीलेश चौधरी, नगराध्यक्ष, धरणगाव
शाळा परिसर स्वच्छ व आरोग्यवर्धक राहण्याच्या दृष्टीने शौचालय दुसरीकडे बांधले गेले पाहिजे होते.
-शेख निजामोद्दीन हुसनोद्दीन, मुख्याध्यापक, उर्दू शाळा, धरणगाव
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता शौचालय दुसरीकडे बांधले गेले असते तर अधिक योग्य राहिले असते.
- अहमद पठाण, नगरसेवक, धरणगाव