शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जगाला आज संत तुकाराम, गौतम बुद्ध यांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2017 13:46 IST

प्रत्येक काळात संत तुकाराम, सॉक्रेटीस, गौतम बुध्द निर्माण होणे गरजेचे आहे.

अतुल पेठे : ‘सांस्कृतिक क्षेत्रापुढील आव्हाने’ या विषयावर मांडले परखड मतजळगाव, दि. 22 - आजचा समाज हा स्थलनशील समाज आहे, असे म्हटले जाते. प्रत्येक काळातील समाज हा नेहमीच सारखाच असतो. सांस्कृतिक आव्हान हेदेखील सारखेच असते. मात्र त्या प्रत्येक काळात संत तुकाराम, सॉक्रेटीस, गौतम बुध्द निर्माण होणे गरजेचे आहे. आपल्या काळातदेखील संत तुकाराम, गौतम बुध्द कसे निर्माण होतील याचा शोध प्रत्येकाने घेतला पाहिजे, असे मत प्रसिध्द नाटय़ दिग्दर्शक अतुल पेठे यांनी व्यक्त केले. परिवर्तन संस्था जळगाव व नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी नूतन मराठा महाविद्यालयातील डॉ.जगदिशचंद्र बोस सभागृहात ‘सांस्कृतिक क्षेत्रापुढील आव्हाने’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी मराठा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक अॅड. विजय पाटील, प्रा.शेखर सोनाळकर, मंजुषा भिडे आदी उपस्थित होते. प्रत्येक काळात सांस्कृतिक आव्हानअतुल पेठे म्हणाले की, प्रत्येक काळात सांस्कृतिक आव्हान हे कायम राहिले आहे. संत ज्ञानेश्वर, सॉक्रेटीस, संत तुकाराम या प्रत्येक संताला, राष्ट्र पुरुषाला आप-आपल्या काळात सांस्कृतिक लढाया या लढाव्या लागल्या. प्रत्येक कालखंडात एक नवीन आव्हान हे सांस्कृतिक क्षेत्रासमोर असते. संत तुकारामांनी या विरोधात आपल्या लेखनी, आपल्या अभंगातून विषमतेचा हुंकार भरत ही लढाई जिंकली. सांस्कृतिक आव्हान ङोलण्यासाठी विचार प्रवृत्ती, समृध्द विचार मनात निर्माण होणे गरजेचे असल्याचे पेठे म्हणाले. आजच्या काळाची भीती वाटतेसध्याचा काळ पाहता या काळाची भीती वाटत असल्याचे अतुल पेठे म्हणाले. आज अमेरिकेने अफगाणिस्तानवर ‘मदर बॉम्ब’ टाकला. उद्या उत्तर कोरिया ‘फादर बॉम्ब’ टाकेल. सध्या सगळे जग पेटेलेले आहे. येणा:या पिढीला आपण काय देणार आहोत? असा प्रश्न नेहमी निर्माण होतो. यामध्ये माझी जबाबदारी काय? हे ओळखणे गरजेचे आहे. कलावंतानी आप-आपल्या कलेला आयुध बनवून या परिस्थितीला तोंड दिले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.