वेळापत्रक एक दिवस पुढे
जळगाव : वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या १२00 मिमी व्यासाच्या जलवाहिनीला मेहरूणमध्ये लागलेली गळती दुरुस्त करण्याचे काम तसेच उमाळा लाईनवरील दोन व्हॉल्व दुरुस्तीचे काम बुधवारी पूर्ण करण्यात आले. त्यामुळे गुरूवारी सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे.
मेहरूण स्मशानभूमीजवळील वाघूर योजनेच्या जलवाहिनीला गेल्या अनेक दिवसांपासून गळती लागली होती. या गळती दुरुस्तीचे काम मंगळवारी दुपारी सुरू झाले. त्यात पाईपच्या जॉईंटला गळती असल्याचे आढळून आले. ही गळती दुरुस्त करण्यात आली. तसेच उमाळे जलवाहिनीवरील दोन व्हॉल्वलाही गळती लागलेली होती. त्याचीही दुरुस्ती केली. बुधवारी दुपारी त्याची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर सायंकाळी गिरणा टाकीत पाणी भरण्यास प्रारंभ झाला.
--------------
दुरुस्तीच्या या कामामुळे बुधवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे नियमित वेळापत्रकानुसार ज्या भागात बुधवारी पाणीपुरवठा होणार होता, तेथे गुरूवारी, तर गुरूवारी पाणी पुरवठा होणार होता, तेथे शुक्रवारी पाणीपुरवठा होईल. पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलले गेले आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.