शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

तहसील कार्यालयात आज लोकशाही दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST

भाजप युवा मोर्चातर्फे आत्मनिर्भर कार्यशाळा जळगाव : भाजप युवा मोर्चाच्यावतीने आत्मनिर्भर भारत योजनेची कार्यशाळा झाली. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ...

भाजप युवा मोर्चातर्फे आत्मनिर्भर कार्यशाळा

जळगाव : भाजप युवा मोर्चाच्यावतीने आत्मनिर्भर भारत योजनेची कार्यशाळा झाली. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश संयोजक हर्षल विभांडक यांनी मार्गदर्शन केले. या वेळी योजनांची माहिती देण्यात आली. लाभ घेण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले. महानगराध्यक्ष आनंद सपकाळे यांनीही मार्गदर्शन केले. सरचिटणीस जितेंद्र चौथे, महेश पाटील, सचिन बाविस्कर, राहुल मिस्त्री आदी उपस्थित होते.

शैक्षणिक कर्जाविषयी खासदारांना निवेदन

जळगाव : शैक्षणिक कर्ज प्रक्रिया सुलभ व्हावी या मागणीसाठी भाजप युवा मार्चाच्यावतीने खासदार उन्मेष पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी युवा मार्चाचे महानगराध्यक्ष आनंद सपकाळे, गोपाळ भंगाळे, पं.स. सदस्य मिलिंद चौधरी, नगरसेवक मयूक कापसे, अक्षय जेजुरकर, महेश पाटील, सचिन बाविस्कर, सागर जाधव उपस्थित होते.

पुरस्काराकरिता प्रस्ताव सादर करा

जळगाव : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला, संस्था, कंपन्या यांना नारी शक्ती पुरस्कार दिला जाणार आहे. २०१९-२० या वर्षाकरीता सदर पुरस्कारासाठी पात्र महिला कार्यकर्त्या, स्वयंसेवी संस्था, कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग इ. कडून अर्ज ऑनलाईन मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालया शी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी केले आहे.

अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव : विविध एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पातंर्गत अंगणवाडी केंद्र असून त्यापैकी काही ग्रामपंचायतीच्या गावी सेविका व मदतनीसांची पदे रिक्त आहेत. यासाठी महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

प्रशिक्षणासाठी नोंदणी

जळगाव : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना बेरोजगार उमेदवारांना नि:शुल्क कौशल्य प्रशिक्षण देणार आहे. यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

पास देण्याची मागणी

जळगाव : शाळा सुरू झाल्या असून ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षणासाठी शहरात येत आहेत. शैक्षणिक सत्रातील सवलत पास मिळावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

सुरेश भोळे यांची निवड

जळगाव : भटक्या विमुक्त जाती जमाती कल्याण समिती सदस्यपदी आमदार सुरेश भोळे यांची निवड करण्यात आली. या निवडीचे युवा मोर्चाचे महानगर चिटणीस जयंत चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.