शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरूण शेतक-याची आत्महत्या! कुसूंबा येथील घटना; अकस्मात मृत्यूची नोंद

By सागर दुबे | Updated: March 20, 2023 22:07 IST

जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथे एका शेतक-याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना

जळगाव :

जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथे एका शेतक-याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. दीपक संतोष पाटील (३५, रा.कुसूंबा) असे मृत शेतक-याचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सोमवारी शवविच्छेदन करून मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

दीपक पाटील हे मुळचे झाडी (ता. अमळनेर) येथील रहिवासी आहेत. गावात त्यांची शेती असून शेती करून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. शेतीसाठी त्यांनी सोसायटीतून कर्ज घेतले होते. पण, निसर्गाचा लहरीपणा आणि हवेतसे उत्पादन नाही, त्यात कर्जाचे डोंगर म्हणून काही वर्षांपूर्वी पाटील हे कुटूंबासह कुसूंबा येथे राहण्यास आले होते. नंतर शेती कामासोबत एमआयडीसी कंपनीत ते हाजमजुरीचे काम करत होते.आईला पाठविले दुकानात, इकडे मुलाची आत्महत्याशनिवारी दीपक यांच्या पत्नी मुलांसह माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे घरी दीपक व त्यांच्या आईच होत्या. रविवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांनी आईला दुकानात काही तरी वस्तू घेण्यास पाठविले. आई दुकानावर गेली तेवढ्यात त्यांनी पॅन्टच्या सहाय्याने घरात गळफास घेवून आत्महत्या केली. रात्री ८ वाजेच्या सुमारास आई दुकानावरून घरी परतल्यावर त्यांना मुलगा हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी आक्रोश केला. त्यानंतर घटनास्थळी रहिवाश्यांची गर्दी झाली. रात्री मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंत मृत घोषित केल्यानंतर सीएमओ डॉ. ममता अच्छा यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सोमवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला. दीपक पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.