शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रमजान ईदसाठी घरी जात असतांना काळाची झडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मुंबईहून हावडाकडे जाणाऱ्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या अबजूर शेख जियाऊल हक (वय २३, रा. रहिमपूर, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मुंबईहून हावडाकडे जाणाऱ्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या अबजूर शेख जियाऊल हक (वय २३, रा. रहिमपूर, माणिकचक, इनायतपूर जि. मालदा पश्चिम बंगाल) या परप्रांतीय तरूणाचा पाय घसरल्याने खाली पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील म्हसावद रेल्वे स्थानकाजवळ घडली.

अबजूर शेख जियाऊल हक हा तरुण नवी मुंबईतील घनसोली येथे बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून कामाला आला होता. गुरुवारी सकाळी त्याचा भाचा मसीद ऊर रहेमान यांच्यासोबत रमजाननिमित्त मुंबईहून पश्चिम बंगाल येथे गावी जाण्यासाठी सकाळी ८ वाजता मुंबईहून बसले होते. दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या दरम्यान मुंबई-हावडा मेलने पाचोराकडून जळगावकडे जात असतांना अबजूर शेख हा पाणी पिण्यासाठी जात असतांना रेल्वे बोगीच्या दरवाजाजवळ पाय घसरल्याने खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला. हा अपघात रेल्वे खंबा क्रमांक ४००/ १३-१५ जवळ घडला. म्हसावद रेल्वे स्टेशन मास्तर राजपूत यांनी जळगाव रेल्वे पोलिसांना माहिती दिली. हवालदार अनिंद्र नगराळे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणला. मयत तरूण हा अविवाहित असून त्याच्या पश्चात चार बहिणी, तीन भाऊ आणि आई असा परिवार आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास अनिंद्र नगराळे करीत आहे.