शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

३१ आॅक्टोबर पर्यंत होणार राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील आराखड्यांची छाननी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 17:25 IST

विद्यापीठांनी सादर केलेल्या बृहद् आराखड्यांची छाननी आणि पूर्नतपासणीसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून स्थापन करण्यात आलेल्या छाननी समितीकडून ३१ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या बृहद् आराखड्यांची छाननी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद येथे पार पडली समितीची पहिली बैठकराज्यातील सर्व विद्यापीठांना भेटी देतील समिती सदस्यसदस्यांकडून सुचविले जातील बदल

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.१३-विद्यापीठांनी सादर केलेल्या बृहद् आराखड्यांची छाननी आणि पूर्नतपासणीसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून स्थापन करण्यात आलेल्या छाननी समितीकडून ३१ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या बृहद् आराखड्यांची छाननी करण्यात येणार आहे. छाननीनंतर समितीकडून संबधित विद्यापीठाच्या आराखड्यांमधील काही बदल असल्यास समितीकडून ते सूचविले जाणार आहेत.

शुक्रवारी छाननी समितीची पहिली बैठक औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठात समिती अध्यक्ष डॉ.के.बी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत शिक्षण तज्ज्ञ अनिल राव, डॉ.विठ्ठलराव घुगे, डॉ.एन.जे.पवार, प्रा.मिलिंद सोहनी, डॉ.बी.एन.जगताप, डॉ.योगानंद काळे, राम भोगले, डॉ.धनराज माने व सिध्दार्थ खरात आदी उपस्थित होते.

राज्यातील सर्व विद्यापीठांना भेटी देतील समिती सदस्यराज्यातील सर्व विद्यापीठांनी आपले वार्षिक व पंचवार्षिक बृहद् आराखडे तयार केले आहेत. या आराखड्यांची छाननी समितीच्या सदस्यांकडून केली जाणार आहेत. त्यामुळे ३१ आॅक्टोबर पर्यंत समितीच्या सदस्यांकडून सर्व अकृषी विद्यापीठांना भेटी दिल्या जाणार आहेत. या दरम्यान आराखडा तयार करताना विद्यापीठांनी ठरविलेले निकष, त्यांचे उदिष्ट याबाबतची माहिती जाणून घेतली जाणार आहे. या छाननीअंती समितीला विद्यापीठांच्या आराखड्यांमध्ये काही बदल करण्याचा सूचना देखील दिल्या जावू शकतात. यासाठी समिती सदस्यांची ३१ आॅक्टोबर व १ नोव्हेंबर बैठक होणार आहे. या बैठकीत समिती सदस्यांकडून आराखड्यांमधील सूचविलेले बदल सांगण्यात येतील.