शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र संरक्षित जंगलातील वृक्षतोड प्रकरणी गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 22:11 IST

वढोदा वनक्षेत्रातील चारठाणा नियतक्षेत्रात येणाऱ्या व्याघ्र संरक्षित क्षेत्रात झालेल्या अवैध वृक्षतोडी प्रकरणी भारतीय वन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देवृक्षतोडीची उपवनसंरक्षकांकडून पाहणीवढोदा वनक्षेत्रातील चारठाणा नियतक्षेत्र

कुºहा काकोडा, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : वढोदा वनक्षेत्रातील चारठाणा नियतक्षेत्रात येणाऱ्या व्याघ्र संरक्षित क्षेत्रात झालेल्या अवैध वृक्षतोडी प्रकरणी भारतीय वन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक डी.डब्ल्यू.पगार यांनी शनिवारी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसेच स्थानिक आदिवासींसोबत चर्चा केली.या जंगलात मदापुरी येथील आदिवासींनी अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने गुरुवारपासून अवैध वृक्षतोड करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी शेकडो मूल्यवान झाडांची कत्तल केली. याप्रकरणी वढोदा वनविभागाच्या कुºहा येथील कार्यालयात वन क्षेत्रपाल अमोल चव्हाण यांनी अतिक्रमण करणाºया आदिवासीं विरोधात गुन्हे दाखल केले आहे. फासेपारधी जमातीच्या शेकडो महिलांनी वृक्षांची बेसुमार कत्तल केल्यामुळे संपूर्ण वनविभाग हादरून गेला. वनविभागाकडे महिला कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प असल्यामुळे अतिक्रमण करणाºया आदिवासी महिलांपुढे वनविभाग हतबल झाला होता. शनिवारी उपवनसंरक्षक डी. डब्ल्यू पगार यांनी घटनास्थळी भेट देवून झालेल्या वृक्षतोडीची पाहणी केली. त्यांच्यासोबत सहायक वनसंरक्षक कांबळे, फिरत्या गस्ती पथकाचे वनक्षेत्रपाल बी.एस.पाटील, सावदा पोलीस स्टेशनचे स.पो.नि. राहुल वाघ, मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे फौजदार नीलेश साळुंके, वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण होते. घटनास्थळी मोठ्या संख्येने आदिवासी महिला व पुरुष जमा झाले होते. यावेळी पगार यांनी उपस्थित समूहाला कोणीही अवैध वृक्षतोड करू नये, अशी ताकीद दिली.

टॅग्स :forest departmentवनविभागMuktainagarमुक्ताईनगर