-----
अशी झाली लागवड
आतापर्यंत बागायती कापूस ७,५४५ हेक्टर, जिरायत कापूस ५७५ हेक्टर, मका १५० हेक्टर, ज्वारी २५ हेक्टर क्षेत्रावर पीक पेरण्या व लागवड करण्यात आली आहे. शेती कामांनी शेतकरी, शेतमजुरांमुळे माळरान गजबजल्याचे चित्र दिसून आले. १६ रोजी तालुक्यात सरासरी १५ मिलिमीटर पाऊस झाला. आतापर्यंत एकूण ५० मिलिमीटर पाऊस बरसल्याची नोंद प्रशासनाने केली आहे. १७ रोजीही तालुक्यात बहुतांश भागात पाऊस झाला. आता शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पीक पेरण्यांचे नियोजन सुरू केले आहे, तर बहुतांश भागात पीक पेरण्यांना सुरुवात झाली आहे.
खरेदीसाठी झुंबड
शेतकरी कृषी केंद्रांवर बी - बियाणे, रासायनिक खते खरेदी करणे, शेती अवजारे दुरुस्ती करणे आदी कामांच्या धावपळीत शेतकरी आहे. तसेच बागायती लागवड केलेल्या कपाशी पिकाची बैलजोडीने आंतरमशागतीचे कामे, निंदणीचे कामे करताना, कपाशी पिकाला रासायनिक खते देतांना मजूर दिसत आहेत.
मागील वर्षीपेक्षा यावर्षी कापूस, सोयाबीन, ज्वारी, मका आदी पिकांच्या पेरणी क्षेत्रात वाढ होऊ शकते. भडगाव तालुक्यात भौगोलिक एकूण ४८,४४६ इतके क्षेत्र आहे, तर लागवडलायक क्षेत्र एकूण ४२ हजार १३१ इतके आहे. खरीप हंगाम पीक पेरणीसाठी सर्वसाधारण क्षेत्र एकूण ५० हजार ९१२ इतके आहे. मागील वर्षी तालुक्यात या क्षेत्रापैकी एकूण ३७ हजार ६९३ हेक्टर क्षेत्रावर पीक पेरण्या झाल्या होत्या.
अशी होणार लागवड
यावर्षी तालुक्याला खरीप हंगामात पीक पेरण्यांचे उद्दिष्ट ३७ हजार ६९३ इतके आहे. या क्षेत्रापर्यंत पीक पेरण्या यंदा होतील, असा अंदाज आहे. मागील वर्षी लहरी निसर्गामुळे खरीप हंगामाचे उत्पन्न शेतकऱ्यांना मारक ठरले होते. कोरोना परिस्थितीमुळेही शेतकरी मोठा अडचणीत आला आहे. मात्र, शेतकरी यावर्षी चांगले उत्पादन आकारेल, या अशी आशा शेतकरीवर्गाला आहे. मागील वर्षी भडगाव तालुक्यात कापूस लागवड एकूण ३३ हजार ६७८पैकी २५ हजार २६० हेक्टर क्षेत्रावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली होती. यावर्षी मात्र कापूस पिकाची लागवड वाढणार आहे.
फोटो — भडगाव शिवारात सोयाबीन पेरणी करतांना शेतकरी.e