शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी शिक्षक लावून जि.प.शाळेत ज्ञानदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 11:54 IST

शासनाचे दुर्लक्ष : शाळेसाठी ग्रामस्थांचा पुढाकार

ठळक मुद्दे गावकरीच अत्यल्प पगार देऊन मुलांना शिकविण्याचे काम राजकीय पाठिंब्या अभावी ही विसंगती शिक्षकही जाण्यास अनुत्सुक

ऑनलाईन लोकमत / संजय पाटील

अमळनेर, जि.जळगाव , दि. 4 - जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक डिजिटल शाळा आणि सर्वाधिक आय.एस.ओ. मानांकित शाळा म्हणून कौतुक होत असलेल्या अमळनेर तालुक्याच्या मठगव्हाण येथे जिल्हा परिषद शाळेत दोन  तरुणींना गावकरीच अत्यल्प पगार देऊन मुलांना शिकविण्याचे काम करून घेत आहे. माहितीचा अधिकार कायद्याच्या अंमलबजावणी नंतरही शिक्षण क्षेत्रातील ही विसंगती अधिका:यांच्या कार्यपद्धतीबद्दल सांशकता व्यक्त करते      तालुक्यात मठगव्हाण येथील जि.प.शाळेत पहिले ते सातवीपयर्ंत वर्ग असून 182 पटसंख्या आहे.   तेथे फक्त 4 शिक्षक कार्यरत  आहेत. वारंवार मागणी करूनही तेथे शिक्षक नेमले गेले नाही. शहरापासून लांब तापी खो:यातील  गाव असल्याने शिक्षकही तेथे जाण्यास अनुत्सुक असतात. गावातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गावातील ग्रामस्थ अधिकारी असलेले वासुदेव पवार आणि सामाजिक कार्यकर्ते किरण पवार यांनी  गावातीलच दोन तरुणींना  प्रत्येकी दोन हजार रुपये वेतन देऊन मुलांना शिकवण्यासाठी नेमले.  त्या मुली उत्कृष्टपणे ज्ञानदान करीत आहेत. तसेच वर्ग खोल्याही अपूर्ण होत्या. मागणी करूनही खोल्या मिळाल्या नाहीत. अखेरीस भगवान पवार, राजेंद्र सोनवणे, भरत शिरसाठ या ग्रामस्थांनी प्रत्येकी एक वर्ग खोली बांधून दिली.   शाळेच्या आधीच्या चार खोल्या गळक्या आहेत. इतर गावात शाळा खोल्या जादाच्या असताना मात्र राजकीय पाठिंब्या अभावी ही विसंगती दिसून येते.  केदार पवार, महेश पवार, सुधाकर पवार आदींनी संगणक ,फर्निचर, प्रोजेक्टर उपलब्ध करून दिले. आता शाळा व्यवस्थित सुरू आहे.  दुसरीकडे लोंढवे येथे 1 ते 7 वर्गावर  150 पटसंख्या  असताना 8 शिक्षक कार्यरत होते.  मात्र विद्याथ्यार्नाभवी 5 ते 7 वर्ग बंद पडले.त्याठिकाणी चार शिक्षक अतिरिक्त होतील. उपसभापती त्रिवेणीबाई पाटील यांनी दखल घेऊन लोंढवे येथील एक शिक्षिकेची मठगव्हाण.ला बदली केली मात्र त्या शिक्षिकेने रुजू होण्याऐवजी रजा टाकली दुसरा एक पदवीधर शिक्षक आजारी आहे त्याची ही लोंढव्याहून बदली केली त्याने पदावनती घेतली आहे.अडचणींवर मात करत येथील मुख्यध्यापक दिनेश मोरे व सहका:यांनी लोकसहभाग वाढवून गुणवत्ता टिकवली आहे.तालुक्यातील इतर ठिकाणचे जादा शिक्षक काढून शैक्षणिक समतोल राखला जाईल कर्तव्यातून पळ काढणा?्या शिक्षकावर कारवाई केली जाईल असे पंचायत समितीच्या उपसभापती त्रिवेणीबाई पाटील यांनी सांगितले.शिक्षक पाठवू  सावखेडा, गंगापुरी,  रुंधटी आदि ठिकाणाहून शिक्षक मठगव्हाणला पाठवले जातील. वरिष्ठ अधिका:यांशी  चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे प्रभारी गटशिक्षणाधिकारी         पी. डी. धनगर  यांनी सांगितले.