जामनेर, जि.जळगाव : बहिणीला त्रास देणाऱ्या मेहुण्याचा शालकाने चाकूने भोसकून खून केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री घडली. नेरी बुद्रूक, ता.जामनेर येथील शालकाने चिंचखेडे बुद्रूक येथील पाहुण्यास रात्री धाब्यावर जेवण खाऊ घातल्यानंतर बोदवड रस्त्यावरील वाडी किल्ला घाटात खून करून मृतदेह चारीत फेकून दिला व रक्ताने माखलेला चाकु घेऊन पोलिसात हजर होऊन घटनेची माहिती दिली. रक्षा बंधनापूर्वीच भावाने बहिणीचे कुंकू पुसल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.भागवत मोतीराम पारधी (वय २८) (रा.चिंचखेडे बुद्रूक, ता.जामनेर) व त्याचा शालक परमेश्वर प्रताप पारधी (रा.नेरी बुद्रूक, ता.जामनेर) हे बुधवारी रात्री चिंचखेडे येथून जामनेरला आले. त्यांनी शहराजवळील धाब्यावर जेवण घेतले व बोदवडकडे दुचाकीने (क्रमांक एमएच-१९-डी-६२८२) जात असताना वाडी किल्ला घाटात परमेश्वर याने भागवत याच्या गळ्यावर व पोटावर चाकूने गंभीर वार करून त्याला रस्त्यावरून खाली चारीत फेकून दिले. रात्री साडे नऊची घटना असून त्यावेळेस जोरदार पाऊस सुरू होता.
वाडी किल्ला घाटात रात्रीच्या पावसात खुनाचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 18:19 IST
बहिणीला त्रास देणाऱ्या मेहुण्याचा शालकाने चाकूने भोसकून खून केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री घडली.
वाडी किल्ला घाटात रात्रीच्या पावसात खुनाचा थरार
ठळक मुद्देनेरीच्या शालकाने केला मेहुण्याचा खूनआरोपी अटकेत