शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाकोदसह तीन गावांना टँकरची गरज

By admin | Updated: May 20, 2017 00:30 IST

जामनेर तालुकाही होरपळू लागला : पाणीटंचाईची तीव्रता वाढली, वाकोदचा प्रस्ताव पडून

जामनेर : दिवसेंदिवस वाढणा:या तापमानामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या तिव्रतेत वाढ होत आहे. वाघूर नदीच्या काठावरील वाकोद गावास गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईने ग्रासले असून यावर ग्रामपंचायतीने टँकरची मागणी केली होती. तथापि वाकोदचा टँकरचा हा प्रस्ताव तहसीलदारांकडे पडून असल्याचे सांगण्यात आले. मात्र दुसरीकडे जनतेला पाणीटंचाईचा दररोज सामना करावा लागत आहे. त्यांना मिळेल तेथून पाणी आणून आपली तहान भागवावी लागत आहे.   दरम्यान,  तालुक्यातील   मोहाडी व खर्चाणे या गावांकडूनदेखील पाण्याच्या टँकरची मागणी आल्याने पंचायत समितीने प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठविण्याची कार्यवाही सुरू केली आहे.      गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा टंचाईची तीव्रता जाणवली नाही. तथापि कोदोली, सारगांव, काळखेडे, चिंचोली पिंप्री, वडगांव बुद्रूक, नांद्रा प्र. लो , तिघ्रे,  वडगाव या गावात विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असल्याची माहिती पंचायत समितीच्या सूत्रांकडून मिळाली.वाकोदला पंधरा दिवसातून पाणीपुरवठा वाकोद हे दहा हजार लोकसंख्येचे गाव असून येथे बारा ते पंधरा दिवसातून पाणीपुरवठा होतो.  या गावाला तोंडापूर धरणातून पाणी पुरविले जाते, मात्र खंडित वीजपुरवठा व वारंवार फुटणा:या जलवाहिनीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. ग्रामपंचायतीने जैन उद्योग समूहाच्या विहिरीवरून पाणीपुरवठा सुरू केला. टंचाईची तीव्रता पाहून ग्रामपंचायतीने दोन टँकरची मागणी केली आहे. दरम्यान, सुटीमुळे व गटविकास अधिकारी रजेवर असल्याने टँकरचे प्रस्ताव पं. स. त पडून होते, आता ते तहसीलदारांकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. मे अखेर्पयत टंचाई स्थितीत वाढ होण्याची शक्यता असून टँकरच्या मागणीतदेखील वाढ होण्याची शक्यता आहे.