शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात तीन हजार भाविकांनी केले अथर्वशीर्ष पठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 13:05 IST

प्रतिसाद : भाग्यवंतांना चांदीचे शिक्के

ठळक मुद्देओंकार ध्वनी, शंखनाद, भाविकांच्या सामूहिक आवर्तनाच्या नादाने सुभाष चौक परिसर भावमयभव्य  मंडपात भाविकांची बसण्याची व्यवस्थाशंखनाद शांतीपाठाव्दारे अथर्वशीर्ष पठणाला सुरुवात

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27 - राष्ट्र समृध्दीसह जिल्ह्यात सर्वत्र शांतता रहावी व एकोपा नांदावा, कोणतेही विघA येवू नये, हा संकल्प घेवून सुभाष चौक मित्र मंडळ, सुभाष चौक पतसंस्था व स्वामी समर्थ केंद्रातर्फे रविवारी सकाळी जळगावातील सुभाष चौकात अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम झाला़ सकाळी 9 ते 11 या वेळेत महिला, पुरुष तसेच तरुण अशा एकूण तीन हजार भाविकांनी अथर्वशीर्ष पठण केल़े ओंकार ध्वनी, शंखनाद, भाविकांच्या सामूहिक आवर्तनाच्या नादाने सुभाष चौक परिसर भावमय झाला होता़ भव्य  मंडपात भाविकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली़ मंडपात प्रवेश करताच भाविकांना भारतीय संस्कृतीप्रमाणे टिळा लावून अथर्वशीर्षचे पुस्तक देण्यात आले.  महेशकुमार त्रिपाठी यांनी पौरोहित्य केल़े स्वामी समर्थ केंद्राचे भाऊसाहेब शिंपी यांची प्रमुख उपस्थिती होती़ गणेशपूजन करून ओंकारध्वनी व शंखनाद शांतीपाठाव्दारे अथर्वशीर्ष पठणाला सुरुवात झाली़ तीन हजार भाविकांच्या सामूहिकरित्या अथर्वशीर्ष पठणाने वातावरणात चैतन्य पसरले होत़े गणपती आरती तसेच राष्ट्रगीताने अथर्वशीर्ष पठणाचा समारोप झाला़ यानंतर कार्यक्रमात सहभागी भाविकांपैकी ‘लकी ड्रॉ’ काढून 51 भाग्यवंतांना 51 चांदीचे शिक्के देण्यात आल़े वाहतुकीचा खोळंबा होवू नये म्हणून मंडळातर्फे दाणा बाजार, बोहरा बाजार, तिजोरी गल्ली, सराफ बाजार या ठिकाणी स्वतंत्र पार्किगची व्यवस्था करण्यात आली होती़