नंदुरबार : किरकोळ कारणावरून तिघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना गोगापूर, ता.शहादा येथे घडली. कोचरा येथील मीना दिलीप ठाकरे, रा.कोचरा यांच्या शेळ्यांनी कल्पना आप्पा ठाकरे यांच्या ओटय़ावरील मका खाल्ल्याने त्याचा राग येऊन वाद झाला. वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. कल्पना आप्पा ठाकरे, जरीबाई आप्पा ठाकरे व आप्पा बुला ठाकरे यांनी मीना दिलीप ठाकरे यांना बेदम मारहाण व शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तिघांविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन जणांची एकास मारहाण
By admin | Updated: October 17, 2015 00:20 IST