शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कार पुलावरुन कोसळल्याने जळगावचे तिघं ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 23:07 IST

भरधाव कार पुलावरुन कोसळल्याने झालेल्या अपघातात डॉ.अर्जुन तेजमल कोळी (वय ६०, रा.वाल्मिक नगर, जळगाव) व  त्यांच्या पत्नी प्रांता (वय ५४) तसेच अलका वसंत नाले (वय ५५, रा.गांधी नगर, जळगाव) हे तिन्ही जण ठार झाले. तर वसंत दामोदर नाले हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी दुपारी चार वाजता नांदूरा शहराजवळील कोलासर गावाजवळ झाला. 

ठळक मुद्दे नांदुराजवळील कोलासर गावाजवळ अपघात   मित्राच्या अंत्येयात्रेला गेले होते एक जण जखमी

आॅनलाइन लोकमतजळगाव दि,२२ : भरधाव कार पुलावरुन कोसळल्याने झालेल्या अपघातात डॉ.अर्जुन तेजमल कोळी (वय ६०, रा.वाल्मिक नगर, जळगाव) व  त्यांच्या पत्नी प्रांता (वय ५४) तसेच अलका वसंत नाले (वय ५५, रा.गांधी नगर, जळगाव) हे तिन्ही जण ठार झाले. तर वसंत दामोदर नाले हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी दुपारी चार वाजता नांदूरा शहराजवळील कोलासर गावाजवळ झाला. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, डॉ.अर्जुन कोळी व वसंत नाले या दोघांच्या जिवलग मित्राचे अमरावती येथे निधन झाले होते. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी डॉ.कोळी, त्यांच्या पत्नी प्रांता, वसंत नाले व त्यांच्या पत्नी अलका असे चौघे जण शनिवारी सकाळी कारने (क्र.एम.एच.१९ बी.जे.५६१४) अमरावती येथे गेले होते. रविवारी दुपारी बारा वाजता ते अमरावती येथून परत येत असताना नांदुरा शहरानजीकच्या अन्सारी गावाजवळील पुलावरुन कार खाली कोसळली. त्यात डोक्याला जबर मार लागल्याने प्रांता कोळी व अलका नाले या दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. डॉ.अर्जुन कोळी व वसंत नाले हे देखील जखमी झाले. डॉ.कोळी हे गंभीर जखमी असल्याने त्यांना जळगाव येथे आणत असताना रस्त्यातच नशिराबाद गावाजवळ त्यांची प्राणज्योत मालवली. नाले यांच्यावर नांदुरा येथे उपचार सुरु आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री दोन्ही महिलांचे मृतदेह जळगावात आणले जाणार आहेत. डॉ.कोळी यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.