शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
4
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
5
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
6
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
7
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
8
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
9
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
10
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
11
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
12
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
13
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
14
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
15
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
16
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
17
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
18
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
19
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
20
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?

तीन गटांमध्ये आघाडीत बिघाडी

By admin | Updated: January 31, 2017 00:10 IST

अमळनेर व चोपडय़ाचा तिढा कायम : राष्ट्रवादीकडून तालुकास्तरावर एबी फॉर्म वाटप

जळगाव : जिल्हा परिषदेत गेली 15 वर्ष सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडीचा निर्णय घेतला. मात्र पाचोरा, जळगाव ग्रामीण व चाळीसगाव तालुक्यातील तीन गटात वाटाघाटी न झाल्याने या ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. तर अमळनेर व चोपडा तालुक्यातील जागा वाटपाचा तिढा संपलेला नसल्याने सोमवारी रात्री उशिरार्पयत चर्चा सुरुच होती.अमळनेर व चोपडय़ाचा तिढा कायमअमळनेर व चोपडा तालुक्यातील जागावाटपात यशस्वी तोडगा निघालेला नाही. चर्चेचे गु:हाळ सोमवारी रात्री उशिरार्पयत सुरु होते. राष्ट्रवादी व काँग्रेस दोन्ही पक्ष आपल्या भूमिकेपासून मागे हटण्यास तयार नसल्याने मंगळवारी पुन्हा या दोन तालुक्यातील जागा वाटपाबाबत चर्चा होणार आहे.  मात्र या तालुक्यात देखील आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.तीन गटांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी समोरासमोरकाँग्रेस व राष्ट्रवादीने निवडणुकीसाठी आघाडी केल्यानंतर सुरुवातीच्या दोन तीन बैठकांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. काँग्रेसने जळगाव तालुक्यातील शिरसोली-चिंचोली गटासाठी आग्रह धरला. मात्र हा गट राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी तो काँग्रेसला सोडण्यास नकार दिला. तर पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर- शिंदाड गटासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय पाटील हे इच्छुक असल्याने काँग्रेसने या गटाची मागणी केली. राष्ट्रवादी देखील या गटासाठी आग्रही आहे. चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड-रांजणगाव या गटासाठी दोन्ही पक्ष आग्रही आहे. या तिन्ही ठिकाणी सोमवार्पयत यशस्वी तोडगा न निघाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकाविरूद्ध लढणार आहेत.राष्ट्रवादीचे एबी फॉर्म रवानाराष्ट्रवादी व काँग्रेसच्या ज्या जागांवर एकमत झाले आहे त्या ठिकाणच्या इच्छुक उमेदवारांच्या नावाचे एबी फॉर्म तालुकाध्यक्षांकडे पाठविण्यात येणार आहे. मंगळवारी त्या-त्या उमेदवारांच्या नावाने हे एबी फॉर्म देण्यात आले आहेत. काँग्रेसने देखील आपल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रदेश काँग्रेसकडे पाठविली असून निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत.पाचोरा तालुक्यातील शिंदाड गट, जळगाव तालुक्यातील शिरसोली-चिंचोली या दोन गटात एकमत न झाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल. तालुकास्तरावर आम्ही उमेदवारांचे एबी फॉर्म पाठविले आहेत.     -डॉ.सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी.तीन गटांमधील जागावाटपात एकमत न झाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल. मात्र उर्वरित गट व गणांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी कायम राहिल.    -अॅड.संदीप पाटील,जिल्हाध्यक्ष,काँग्रेस