शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

महसूलच्या पथकाने पकडले वाळूचे तीन डंपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 14:09 IST

प्रत्येकी अडीच लाखाचा दंड : शिरसोली येथेही पकडला ट्रक

जळगाव : अवैध वाळू वाहतूक करणारे तीन डंपर शुक्रवारी महसूलच्या पथकाने पकडून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले. त्यांचा पंचनामा करण्यात आला असून प्रत्येकी अडीच लाख रुपयांची दंडाची नोटीस बजावण्यात आली.सध्या वाळू वाहतूक बंद असताना शहर व परिसरात अवैध वाळू वाहतूक होते की काय याची माहिती घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी तहसीलदार वैशाली हिंगे, जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण, तलाठी वंजारी व पोलीस कर्मचारी असोदा रेल्वे फाटकनजीक पोहचले. सकाळी आठ वाजेच्या सुमारास असोदा रेल्वे फाटक ते लेंडी नाल्यादरम्यान वाळूची वाहतूक करताना तीन डंपर आढळून आले. त्या वेळी या पथकाने या डंपरला अडवून पाहणी केली असता त्यात वाळू भरलेली आढळून आली. ही तीनही डंपर (क्र. एम.एच. १९ सीवाय - १११४, एम.एच. १९ सीवाय - १११३ व एम.एच. ०६ ३७६३) पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात आणून जमा केली. त्यांचा पंचनामा करण्यात आला असून या डंपरला प्रत्येकी अडीच लाख रुपयांची नोटीस बजावण्यात येणार आहे.शिरसोलीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा थरारशिरसोली प्र.बो.- बाजार पेठेतून भरधाव वेगाने जाणारे अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर तलाठ्यांच्या पथकाने पकडले. वर्दळीच्या ठिकाणाहून भरधाव वेगाने हे डंपर गेल्याने सर्वांचा थरकाप उडाला. या वेळी मोठी दुर्घटना टळली. डंपर चालक डंपर सोडून पळून गेला. पथकाने डंपर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले आहे. शिरसोली येथे संध्याकाळी सहा वाजेदरम्यान बाजारपेठेत मोठी गर्दी असताना गिरणा नदी पात्रातून वाळू भरुन आलेले डंपर बाजार पेठेतून भरधाव वेगाने गेले. त्या वेळी अनेकांनी जीव मुठीत घेवून बाजूला पळाले. त्या वेली संध्याकाली म्हसावद मंडल अधिकारी जे.एस. गुरव, तलाठी एस.आर. नेरकर, राहुल अहिरे, मनोज सोनवणे व भारत नन्नवरे यांच्या पथकाने हे डंपर शिरसोली गावात पकडले. या वेळी डंपर चालकाने डंपर सोडून पळ काडला.