शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मानराज पार्कजवळ तिघांना स्टंपसह बॅटने बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:32 IST

गुन्हा दाखल : तीन जण जखमी जळगाव : शहरातील मानराज पार्कजवळील राममंदिर ट्रस्टच्या मैदानावर खेळण्यास गेलेल्या मुलाला का मारहाण ...

गुन्हा दाखल : तीन जण जखमी

जळगाव : शहरातील मानराज पार्कजवळील राममंदिर ट्रस्टच्या मैदानावर खेळण्यास गेलेल्या मुलाला का मारहाण केली, याचा जाब विचारण्यास गेलेल्या वडिलांसह मुलाचा मामा तसेच आतेभावाला तीन जणांनी बॅट, स्टम्पने मारहाण करून १० हजार रुपये बळजबरीने काढून घेतल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी मंगळवारी रामानंदनगर पोलिसात श्रीरंग पाटीलसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पिंप्राळा परिसरातील विद्यानगर येथे राजेंद्र शिवराम सोनवणे (वय ४१) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा जय हा मानराज पार्कजवळील राममंदिर ट्रस्टच्या मैदानावर खेळण्यासाठी गेला असता, त्याला तीन ते चार जणांनी विनाकारण मारहाण केली होती. विनाकारण मारहाण का केली याबाबतचा जाब संबंधितांना विचारण्यासाठी सोमवारी जयचे वडील राजेंद्र सोनवणे, आतेभाऊ कुलभूषण साळुंखे व मामा पवन साहेबराव सैंदाणे हे मैदानावर गेले असता, संबंधितांनी जयच्या वडिलांच्या पाठीत क्रिकेट खेळण्याच्या स्टम्पने पाठीत मारहाण केली, तर याचवेळी कुलभूषण साळुंखे यासही स्टम्पने मारहाण करण्यात आली. पवन सैंदाणे यांच्या डोक्यात एकाने बॅट मारुन दुखापतीचा प्रयत्न केला. मात्र पवन यांनी ते चुकविल्याने त्याच्या हातास गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी पवनच्या खिशातील १० हजार रुपयेही संबंधितांनी हिसकावून घेतले. या मारहाणीत राजेंद्र सोनवणे यांच्यासह कुलभूषण साळुंखे, पवन सैंदाणे यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी राजेंद्र सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिसात श्रीरंग पाटील यांच्यासह तिघांविरोधात दरोड्यासह मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी हे करीत आहेत.