शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सर्जा-राजासाठी तीन एकर शेत राखीव

By admin | Updated: August 25, 2014 14:39 IST

बारमाही दोन वेळेस हिरवा चारा.. सायंकाळी पशुखाद्याचा आहार व सकस कोरडा चारा देणे कधीच चुकत नाही.. आणि अपवाद वगळता असा एकही दिवस नसतो ज्यात ढवळ्य़ा-पवळ्य़ाचे दर्शन होत नाही..

चंद्रकांत जाधव■ जळगाव

बारमाही दोन वेळेस हिरवा चारा.. सायंकाळी पशुखाद्याचा आहार व सकस कोरडा चारा देणे कधीच चुकत नाही.. आणि अपवाद वगळता असा एकही दिवस नसतो ज्यात ढवळ्य़ा-पवळ्य़ाचे दर्शन होत नाही..
गाढोदा ता.जळगाव येथील शेतकरी गोपाळ फकीरचंद पाटील हे आपल्या बैलजोडीची निगा राखण्यात दरवर्षी हजारो रुपये खर्च करतात. पाटील व त्यांचे सात भाऊ असे एकत्रित कुटुंब असताना त्यांच्याकडे १२ बैलजोड्या होत्या. ट्रॅक्टर व इतर साधने होती, पण बैलजोडीशिवाय शेती कधी केली नाही आणि करणारही नाही, असे पाटील म्हणतात. बैलजोडीला अलीकडे काम नसते. पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. आता आधुनिक साधनांमुळे बैलजोडीची कामे कमी झाली आहेत. पण पुढे बैलजोडीचे काम राहणार नाही, अशी परिस्थिती आली तरी बैलजोडी घरासमोर राहीलच, असेही पाटील म्हणतात. आता आम्ही भावंडे विभक्त झाल्याने शेतीचेही विभाजन झाले आहे. २५ एकर बागायती जमीन आहे, पण दोन बैलजोड्या ठेवल्या आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र शेड आहे. वर्षभर पुरेल एवढा कोरडा चारा असतो. त्यात दादरच्या सकस मानल्या जाणार्‍या कुट्टीचा अधिक भरणा असतो. पशुखाद्य घरीच तयार केले जाते. त्यासाठी गहू व ज्वारीचा उपयोग केला जातो. ते भुकेले असले तर लागलीच जाणवते. तसे संकेत ते देतात. जेव्हा मी शेतात जातो तेव्हा त्यांना शेतात चारा मिळालेला नसला तर ते माना खाली घालायला लागतात. नंतर चौघांमधील एखादा बैल हंबरतो. मग लक्षात येते की, ते भुकेले झाले आहेत. अशात त्यांना जुंपलेल्या कामातून मोकळीक दिलीच जाते. त्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेतली जाते. पशुवैद्यक हे महिन्यातून एकदा येऊन त्यांची तपासणी करतात. शेती आणि शेतकरी असे समीकरण आहे. जळगाव : दीड एकरात यशवंत व जयवंत गवत, रुचिरा जातीच्या हिरव्या चारा पिकाची लागवड..भव्य शेडची व्यवस्था.. सर्जा-राजाला गव्हाणीत चार्‍यासह पाण्याची व्यवस्था. रोज दोन वेळेस हिरवी कुट्टी..अशी व्यवस्था फुपनगरी ता.जळगाव येथील भगवंतराव जाधव यांनी आपल्या सर्जा-राजासाठी केली आहे. 
त्यांच्याकडे चार बैलजोड्या आहेत. ते दोन भाऊ आहेत. धाकटे श्यामकांत जाधव यांनाही बैलजोड्यांची आवड आहे. त्यांचे वडील कै.भाऊलाल जाधव यांचा कल घरच्या गायींच्या गोर्‍ह्यांना तयार करण्याकडे होता. अलीकडे ते शक्य नसले तरी एक बैलजोडी किमान १0 ते १५ वर्षे त्यांच्याकडे राहते. त्यांची ९0 एकर शेती आहे. लहान आणि मोठे असे दोन ट्रॅक्टर आहेत. पण बैलजोड्या कमी करू, असे त्यांच्याकडे कधीच झालेले नाही. गोठा एकूण तीन एकरात आहे. दीड एकरात चारा पिके, उर्वरित क्षेत्रात गोदामे व इतर सुविधा आहे. बैलजोड्यांचे दावण सोडून त्यांना पाणी पाजण्याची गरज नाही, कारण त्यांना दावणावरच एका चारीद्वारे पाणी पिण्यास मिळते. पाण्यासाठी कूपनलिकेवरून स्वतंत्र जलवाहिनी टाकून जलकुंभही तयार केला आहे. गोठय़ात पेव्हर ब्लॉक बसविले आहेत. हिरव्या चार्‍याची कुट्टी करण्यासाठी विजेवर चालणारे कटर मशीन आहे. बैलजोड्यांसह इतर पशुधनाला दरवर्षी घटसर्प, गोचीड, लाळ खुरगटाचे लसीकरण केले जाते. सर्व बैलजोड्यांना सायंकाळी पशुखाद्य दिले जाते.