शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनाचा धाक संपला...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 12:49 IST

वार्तापत्र -महसूल

जिल्हा लोकशाही दिनातील दीड वर्षापासूनच्या प्रलंबित असलेल्या १३०७ तक्रारी, जलयुक्त शिवारची टप्पा चार सुरू झाला असतानाही प्रलंबित असलेली टप्पा २ ची कामे, जिल्ह्यात सुरू असलेली सर्रास अवैध वाळू वाहतूक, सातबारा संगणकीकरणाचे रखडलेले काम आदी विविध बाबींचा विचार करता जिल्हा प्रशासनाचा विविध विभागांवरील धाक संपला की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.लोकशाही दिनातील तक्रारींचा निपटारा महिनाभरात करण्याचे शासन आदेश असतानाही दीड वर्षांपासून तक्रारी त्याही १३०७ प्रलंबित राहतातच कशा? असा सवाल उपस्थित होत आहे. तक्रारदार पुन्हा पुन्हा येतात, किंवा अनेक तक्रारी लोकशाही दिनाशी संबंधीत नसतातच, असे युक्तीवाद याबाबत केले जात आहेत. मात्र तसे असले तरीही त्याबाबत कारण देऊन तक्रार निकाली काढता येऊ शकते. मात्र तसे झालेले नाही. त्यावरून विविध विभागांकडून लोकशाही दिनातील तक्रारींना केराची टोपलीच दाखविली जात असल्याचे दिसून येत आहे. सहकार विभागाने तर ठेवीदारांच्या विषयात केवळ वेळकाढू पणा करण्याचे धोरण अवलंबलेले दिसत आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: आढावा घेण्याची मागणी ठेवीदारांकडून होत आहे.जलयुक्त शिवार योजनेच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. जिल्ह्यात आता टप्पा ४ साठी गावांची नावे निश्चित करणे सुरू झालेले असताना अद्यापही टप्पा २ ची कामेच प्रलंबित आहेत. विशेषत: जिल्हा परिषदेची मोठ्या प्रमाणावर कामे बाकी आहेत. सिमेंट बंधाºयांचीच १०-१२ कामे बाकी आहेत. त्यामुळे ही कामे कधी पूर्ण होणार? व त्यात पाणी कधी साठणार? असा सवाल उपस्थित होत आहे. तर कृषी विभागाची देखील एरंडोल तालुक्यातील कामे राहिली आहेत. जि.प.कडील या योजनांची अंदाजपत्रकेच चुकीच्या पद्धतीने बनविली आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांनी नुकतीच आढावा बैठक घेऊन मुदतीत कामे पूर्ण न केल्यास संबंधीत अधिकाºयांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मात्र आता जेमतेम महिनाभराचा कालावधी उरला असून जून महिन्यात पावसाला सुरूवात होईल. त्यापूर्वी ही कामे पूर्ण करणे खरोखर शक्य होईल का?असा सवाल आहे. जिल्ह्यातील सातबारा संगणकीकरण असो की, कारवाई न करण्याचा आर्शीवाद लाभलेली वाळू वाहतूक असो, जिल्हाधिकाºयांनी आदेश दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचेच चित्र दिसून येत आहे. सातबारा संगणकीकरणाचे काम महिना-दोन महिन्यात पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाºयांनी मागील वर्षीच महसूल दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांसमोर जाहीर केले होते. मात्र प्रांताधिकारी, तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावूनही अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचा धाक संपला की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.               -सुशील देवकर