शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रामीण पेयजल’ने भागणार 15 गावांची तहान

By admin | Updated: May 18, 2017 11:54 IST

अमळनेर तालुक्यात 4, चोपडा तालुक्यातील 8 व पारोळा तालुक्यातील 3 गावांना पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत.

ऑनलाइन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. 18 -ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत अमळनेर तालुक्यात 4, चोपडा तालुक्यातील 8 व पारोळा तालुक्यातील 3 गावांना पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत.अमळनेर तालुक्यातील डांगर येथे सुमारे 14 ते 15 वर्षापासून उन्हाळ्यात दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे डांगर या गावासाठी सहा कि.मी.अंतरावरील पारोळा तालुक्यातील पिंपळकोठा, भोलाणे येथील इंदासी धरणाच्या जवळील विहिरीवरुन जलवाहिनी टाकून 97.99 लाखाची कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना तयार करण्यात येणार आहे. दोधवद येथे 56.95 लाखाची तापी नदीवरुन योजना मंजूर झाली आहे. तापी नदीचे पाणी सरळ घेतल्यास गाळ येवू शकतो, क्षार येवू शकतात. म्हणून पाण्याची टाकी न घेता फिल्टर प्लॅण्टची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणेकर यांची मंजुरी घेवून नव्याने 15 मे रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला. सारबेटे येथे 52.02 लाख किंमतीची चिखली नदी काठावरील विहिरीतून तर जुनोने येथे नाल्याजवळील विहिरीतून  61.62 लाखाची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे.चोपडा तालुक्यातील भवाळे, गलंगी, गणपूर, गोरगावले खुर्द, कृष्णापूर, माचले, मजरेहिंगोणे, सत्रासेन या आठ गावांना तर पारोळा तालुक्यातील मंगरुळ, रताळे, तामसवाडी या गावांना मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत.