शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’चा परिणाम, खान्देशातील हजारो पर्यटकांनी परदेशवारीचे तिकीट केले रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:18 IST

देशांतर्गत पर्यटनाच्या तारखा पुढे ढकल्या

जळगाव : गेल्या महिनाभरापासून जगभरात ‘कोरोना’ने हाहाकार केल्यामुळे याचा पर्यटनावरही मोठा परिणाम झाला आहे. खान्देशातून पर्यटनासाठी थायलंड, सिंगापूरला जाणाऱ्या दीड हजारो पर्यटकांनी तिकीट रद्द केले आहे तर शिमला, दार्जिलिंगला जाणाºया पर्यटकांनी आपल्या पर्यटनाचे नियोजन पुढे ढकलले आहेत.चीनहून कोरोना या विषाणूच्या प्रसाराला सुरुवात झाली असली तरी सद्यस्थितीत त्याचा जगभर फैलाव होत आहे. कोरोनामुळे चीनमधील लाखो भारतीय मायदेशी परतले आहे. इतकेच नव्हे तर त्याचा परिणामी देशी- विदेशी पर्यटनावर मोठा होत आहे. भारतातून दरवर्षी उन्हाळ््यात थायलंड, सिंगापूर, मलेशिया इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक पर्यटनासाठी जात असतात. त्यानुसार यंदाही खान्देशातील हजारो पर्यटकांनी परदेशात जाण्यासाठी तिकीट बुकींग केले होते. मात्र, कोरोनामुळे पर्यटकांना विदेशातील पर्यटनाचा प्रवास रद्द करावा लागत आहे.पंधरा दिवसांपासून सर्व व्यवहार टप्पपर्यटन कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, करोनाच्या भीतीमुळे बहुतांश नागरिकांनी विदेशातील पर्यटनाचे तिकीट रद्द केल्यामुळे, आमचा उन्हाळ्यातील हंगाम पूर्ण ठप्प झाला आहे. उन्हाळ््यातच पर्यटन कंपन्यांसह विमान कंपन्या व हॉटेल व्यावसायिकांना खºया अर्थाने व्यावसायाची संधी असते. मात्र, कोरोनामुळे पंधरा दिवसांपासून अनेकांनी तिकीट रद्द केल्यामुळे, मोठा फटका बसल्याचेही पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले. विशेषत: यामुळे पर्यटन कंपन्यांमध्ये काम करणाºया कर्मचाऱ्यांमध्येही बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याचे सांगण्यात आले.खान्देशातील दीड हजारांहून नागरिकांनी तिकीट केले रद्दशहरातील विविध आंतरराष्ट्रीय पर्यटन कंपनीच्या प्रतिनिधींनी ‘लोकमत’ला सांगितले की, जळगाव, धुळे व नंदुरबार या ठिकाणाहून दरवर्षी हजारो पर्यटक विदेशात फिरण्यासाठी जातात. त्यानुसार यदांही दिवाळीपूर्वीचं अनेक नागरिकांनी पर्यटनाचे नियोजन करुन, तिकीट बुकींग केले होते. या पर्यटकांना विमान प्रवासाच्या तारखादेखील देण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून या पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर तिकीट रद्द करण्यात येत आहे. खान्देशातील जवळपास दीड हजारांहून नागरिकांनी विविध देशांचे तिकीट रद्द केले असल्याचे पर्यटन कंपन्यांतर्फे सांगण्यात आले. तसेच अनेक नागरिकांनी शिमला, दार्जिलींग, राजस्थान, गोवा या ठिकाणी जाणाºया पर्यटकांनी मार्च-एप्रिलमधील पर्यटनाच्या तारखा रद्द करुन मे व जूनमधील तारखा निवडल्या असल्याचेही पर्यटन कंपन्यांतर्फे सांगण्यात आले.जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून विदेशात फिरायला जाणाºया आतापर्यंत एक हजाराहून अधिक जणांनी तिकीटे रद्द केली आहेत. भारतातील पर्यटनाच्या तारखेतही बदल करीत आहेत. यामुळे आमच्या पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. -सचिन पाटील, पर्यटन व्यावसायिक.सिंगापूर, दुबई, युरोप आदी ठिकाणी उन्हाळ््याच्या सुट्टीनिमित्त पर्यटकांनी बुकींग केलेले तिकीट गेल्या आठवडाभरापासून कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर रद्द करण्यात येत आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळ््यात आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होत आहे. तसेच विदेशातूनही पर्यटनाकरिता भारतात येणाºयांचे प्रमाण कमी झाल्याने पर्यटन व्यावसायवर अवलंबून असणाºया नागरिकांवर बेरोजगारी ओढावत आहे.-राहुल शर्मा, पर्यटन व्यावसायिक

टॅग्स :Jalgaonजळगाव