शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर येथे मार्गशीर्ष महिन्याच्या एकादशी वारीनिमित्त मुक्ताईचे घेतले हजारो भाविकांनी दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 21:22 IST

कॅलेंडर वर्षांमधील मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व बघता श्री संत मुक्ताईचे दर्शन घेण्यासाठी मुक्ताईनगर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. विविध धार्मिक उपक्रम व पूजन झाले. मार्गशीर्ष महिना हा धार्मिकदृष्ट्या विविध योजना मार्गी लावण्याचा महिना समजला जातो. त्यामुळे अध्यात्म व धार्मिक दृष्ट्या या महिन्याच विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या एकादशी वारीनिमित्त मुक्ताईनगर येथील श्रीक्षेत्र कोथळी येथे व नवीन मुक्ताई मंदिर परिसरात वारकऱ्यांची आज मोठी गर्दी जमली.

ठळक मुद्देदर्शनासाठी भाविकांनी केली गर्दी५० दिंड्यांनी संत मुक्ताई देवस्थानावर लावली हजेरी

मुक्ताईनगर, जि.जळगाव : कॅलेंडर वर्षांमधील मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व बघता श्री संत मुक्ताईचे दर्शन घेण्यासाठी मुक्ताईनगर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. विविध धार्मिक उपक्रम व पूजन झाले. मार्गशीर्ष महिना हा धार्मिकदृष्ट्या विविध योजना मार्गी लावण्याचा महिना समजला जातो. त्यामुळे अध्यात्म व धार्मिक दृष्ट्या या महिन्याच विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या एकादशी वारीनिमित्त मुक्ताईनगर येथील श्रीक्षेत्र कोथळी येथे व नवीन मुक्ताई मंदिर परिसरात वारकऱ्यांची आज मोठी गर्दी जमली. जवळपास ५० दिंड्यांनी ज्यामध्ये मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या विविध भागातून संत मुक्ताई देवस्थानावर उपस्थिती लावली. त्याचबरोबर बारस क्या दिवशी झेंडूजी महाराज बिडकर यांची पुण्यतिथी असल्याने खान्देशच्या भाविकांसाठी एक मोठी मांदियाळी असल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी या ठिकाणी होती.नवीन मुक्ताई मंदिरात संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्याहस्ते महापूजा करण्यात आले, तर जुने मुक्ताई मंदिरात विनोद पाटील मनुरकर यांच्याहस्ते महापूजा करण्यात आली.जुने मुक्ताई मंदिरात गंभीर चौधरी विटवे, विष्णू राणे कोथळी, भागवत भिसे बोदवड तसेच चिनावलच्या ग्रामस्थांनी संत मुक्ताई मंदिर विठ्ठल मंदिराच्या ठिकाणी फराळ वाटप केले. त्याचबरोबर ईश्वर महाराज पाळधीकर व विश्वंभर महाराज तिजारे यांचे कीर्तनदेखील झाले.नवीन मुक्ताई मंदिरात व्यवस्थापक रवींद्र हरणे महाराज यांचे कीर्तन झाले तर साकरी व वाघारी येथील ग्रामस्थांतर्फे महाभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आजच्या दिंडी सोहळा व मार्गशीर्ष वारी सोहळ्याच्यासाठी संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, व्यवस्थापक हरिभक्त परायण रवींद्र हरणे आणि हरिभक्त परायण उद्धव जुनारे यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर