शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात डोळ्यात मिरची टाकून व पिस्तुल रोखून हवालाचे सहा लाख लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 23:19 IST

डोळ्यात मिरची पावडर तर डोक्यात लोखंडी रॉड टाकून पिस्तुल रोखून दिलीप दशरथभाई पटेल (वय ४०, रा. प्लॅट क्र.१, पद्मालया अपार्टमेंट, प्रेम नगर पिंप्राळा रोड, जळगाव) यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून सहा लाख रुपये लुटल्याची घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजून २६ मिनिटांनी पटेल यांच्या घरासमोरच घडली. ही रक्कम हवालाची असल्याचे खुद्द पटेल यांनीच सांगितले.

ठळक मुद्देपिंप्राळा रस्त्यावर थरार  डोक्यात टाकला लोखंडी रॉड दुचाकीवरुन आले चोरटे

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२३: डोळ्यात मिरची पावडर तर डोक्यात लोखंडी रॉड टाकून पिस्तुल रोखून दिलीप दशरथभाई पटेल (वय ४०, रा. प्लॅट क्र.१, पद्मालया अपार्टमेंट, प्रेम नगर पिंप्राळा रोड, जळगाव) यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून सहा लाख रुपये लुटल्याची घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजून २६ मिनिटांनी पटेल यांच्या घरासमोरच घडली. ही रक्कम हवालाची असल्याचे खुद्द पटेल यांनीच सांगितले.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दिलीप पटेल व त्यांचे सहकारी प्रवीण भाई पटेल हे हवालाचे व्यवहार   करतात. शनिवारी सायंकाळी सात वाजता दिलीप पटेल यांनी बी.जे.मार्केटमधील तिरुपती पाईप नावाच्या हवालाच्या कार्यालयातून धीरज भाई यांच्याकडून सहा लाख रुपये घेतले. ते कापडात गुंडाळून दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. त्यानंतर प्रवीणभाई पटेल यांना सोबत घेऊन दुचाकीने (क्र.एम.एच.१९-४५१३) घरी येण्यासाठी निघाले. घरी येताच अपार्टमेंटच्या प्रवेशद्वाराजवळच ७.२५ वाजता दोन जणांनी या दोघांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकले, त्यामुळे दोघंही गोंधळले तर एका चोरट्याने दिलीप पटेल यांच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकला. हा प्रकार पाहून प्रवीणभाई तेथून धावतच कंपाऊडमध्ये आले व आरडाओरड करायला लागले. डिक्कीत पैसे असल्याने दिलीप यांनी दुचाकी सोडली नाही, त्यामुळे एका जणाने त्यांच्यावर पिस्तुल रोखले. त्यामुळे घाबरुन दिलीप यांनी दुचाकी सोडली. क्षणाचाही विलंब न करता डिक्कीतील सहा लाखाची रोकड घेऊन चोरट्यांनी महामार्गाच्या दिशेन पलायन केले.पटेल यांच्याआधी चोरटे पोहचले घराजवळपटेल हे घरी पोहचण्याआधी हे चोरटे त्यांच्या घराजवळ पोहचले होते. रेल्वे रुळाच्या दिशेने विरुध्द बाजूने त्यांनी दुचाकी लावली होती. तर कंपाऊडच्या गेटजवळ भींतीला लागून हे चोरटे थांबलेले होते. पटेल हे कंपाऊडच्या गेटजवळ येताच चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. फक्त दोन मिनिटाच्या आतच चोरट्यांनी हा खेळ केला.