जळगाव -जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव येथे स्वॅब घेतलेल्या 103 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 71 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून *बत्तीस* व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.पॉझिटिव्ह आढळलेले रूग्णांमध्ये अडावद, चोपडा येथील एक, अमळनेर येथील एकतीस असे एकूण बत्तीस रूग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या *157* इतकी झाली असून त्यापैकी अठरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
जळगाव जिल्ह्यात आणखी बत्तीस कोरोना बाधित रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 09:51 IST