शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

भादलीतील महिला राखीव प्रवर्गातून तृतीयपंथीय अंजली पाटील विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 18:21 IST

प्रशासनाने अर्ज ठरविला होता बाद : न्यायालयाचा दिलासा मिळाल्यानंतर मतदारराजानेही दिला विजयाचा कौल

जळगाव : सर्वसाधारण स्त्री राखीव प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभागातून इतर म्हणून उमेदवारी अर्ज नाकारलेल्या व नंतर न्यायालयीन लढ्यात उमेदवारी मिळालेल्या भादली बुद्रुक येथील वॉर्ड क्रमांक चारमधून तृतीयपंथी अंजली पाटील (गुरू संजना जान) या विजयी ठरल्या आहेत. त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी मीना हरुल पटेल यांचा १७४ मतांनी पराभव केला.भादली बुद्रुक येथील वॉर्ड क्रमांक चारमधून तृतीयपंथी अंजली पाटील यांनी महिला राखीवमधून अर्ज दाखल केला होता. यात त्यांनी ह्यलिंगह्ण प्रकारापुढे ह्यइतरह्ण असे नमूद केल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज नाकारण्यात आला. त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली व त्यांना स्त्री संवर्गातून निवडणूक लढविण्यास परवानगी मिळाली होती. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या युवा जिल्हाध्यक्षा शमिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रभागात जोमाने प्रचार केला व यात त्यांना अखेर यश मिळाले.१५ जानेवारी रोजी झालेल्या मतदानानंतर अनेक जण विजयाचे दावे करीत होते. मात्र अंजली यांनी शांत राहत निकालाची प्रतीक्षा केली व सोमवारी सकाळी झालेल्या मतमोजणीत वॉर्ड क्रमांक चारमधून अंजली पाटील या विजयी ठरल्या. त्या जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथीय लोकप्रतिनिधी बनल्या आहेत. अंजली पाटील यांनी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीतही उमेदवारी दाखल केली होती. मात्र त्या वेळी त्यांचा केवळ ११ मतांनी पराभव झाला होता. मात्र या वेळी त्यांनी तब्बल ५४८ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी मीना हरुल पटेल यांना ३७४ मते मिळाली.

जनतेच्या आशीर्वादाने मी निवडून आले. आता गावातील समस्या माझ्या जबाबदारीने मी सोडविणार असून माझ्या उमेदवारीवर दाखविलेला विश्‍वास सार्थ ठरवेन.- अंजली पाटील, विजयी तृतीय पंथीय उमेदवार.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव