शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बोदवड शहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 17:31 IST

बोदवड नगरपंचायतीने आधुनिकतेकडे एक पाऊल टाकत शहरातील कायदा सुव्यवस्था व गुन्हेगारी यावर नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी शहरात नावीण्यपूर्ण योजनेंतर्गत ११ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे मंजूर करून घेतले असून, यासाठी सुमारे २५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

ठळक मुद्देपोलीस नियंत्रण कक्षात राहणार डिस्प्लेनावीण्यपूर्ण योजनेतून २५ लाखांचा खर्च

बोदवड, जि.जळगाव : बोदवड नगरपंचायतीने आधुनिकतेकडे एक पाऊल टाकत शहरातील कायदा सुव्यवस्था व गुन्हेगारी यावर नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी शहरात नावीण्यपूर्ण योजनेंतर्गत ११ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे मंजूर करून घेतले असून, यासाठी सुमारे २५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यातून शहरातील भुसावळ चौफुली, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, बसस्थानक, मलकापूर चौक, चौफुली गांधी चौक, सुराणा निवास परिसर, होळी मैदान, बारा भाई गल्ली, बारभाई वाडा, जामठी दरवाजा, म्हसोबा मंदिर, नगर पंचायत कार्यालयवजवळ व आणखी गरज असेल त्याठिकाणी हे कॅमेरे बसविले जाणार आहेत. यातील गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, बसस्थानक याठिकाणी बसविण्यात आले आहेत. याचे डिस्प्ले व देखरेख नगरपंचायत कार्यालय व बोदवड पोलीस ठाण्यात नियंत्रण कक्षात बसविण्यात आले आहेत. यातून समस्त शहरावर आता सीसीटीव्हीचा तिसरा डोळा नजर ठेवणार आहे. यामुळे शाळा कॉलेज परिसरात टवाळखोरवरही वचक बसणार व गुन्हेगारीला आळा लावण्यास पोलीस प्रशासनाला मदतही होणार आहे. यामुळे शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.सदर आणखी कॅमेरे हे महाविद्यालय परिसराजवळ लावण्यात येणार असल्याची माहिती नगर पंचायत कार्यालय अधीक्षक राजूसिंग चव्हाण यांनी दिली.