शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात 14 हजार लांबविणारा चोरटा बसमध्येच सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 11:32 IST

बस थेट पोलीस स्टेशनमध्ये : सर्व प्रवाशांची तपासणी; वृद्ध व वाहकाची सतर्कता

ठळक मुद्देचोरटय़ाने बॅगेत ठेवले होते पैसेतत्काळ बस नेली जिल्हापेठ पोलीस ठाण्यातनेरीदिगर येथील वृद्धाचे पैसे लांबविले

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 9 - नवीन बसस्थानकात बसमध्ये चढणा:या एका वृध्द प्रवाशाचे 14 हजार रुपये लांबवून बसमध्ये प्रवासी म्हणून बसलेल्या चोरटय़ास शुक्रवारी दुपारी जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आह़े वृध्दाने सतर्कता दाखवित तत्काळ बस पोलीस ठाण्यात नेल्याने पोलिसांनी केलेल्या प्रवाशांच्या चौकशीत चोरटा सापडला़ विनोद धोंडीराम चव्हाण रा़ सिंदखेड राजा जि़बुलढाणा असे चोरटय़ाचे नाव आह़ेदयानंद आनंदराव बिरहारी (वय-80, रा़नेरीदिगर ता़जामनेर) हे आरोग्य विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी आह़े नेहमीप्रमाणे पेन्शनचे पैसे काढण्यासाठी बिरहारी हे सकाळी 9़30 वाजता नेरीहून जळगावला आल़े पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत खाते असल्याने तेथे पैसे काढण्यासाठी गेल़े खात्यावर 14 हजार रुपये घेतल़े हातरुमालात पैसे गुंडाळून खिशात ठेवले व पुन्हा गावाकडे परत जाण्यासाठी बसस्थानकात आल़े 11 वाजेच्या सुमारास जळगाव-जामनेर बसमध्ये (क्ऱ एम़एच 19 बी़टी़ 0102) चढत असताना त्याच्या खिशातून 14 हजार रुपये लांबविल़े बसमध्ये चढल्यावर सीटवर बसताना पैसे नसल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला़बसमध्ये चढत असताना हिसका देणा:या एकाने पैसे लांबविले व तो बसमध्ये चढल्याच्या संशयावरुन बिरहारी यांनी कुठलाही वेळ वाया न घालविता,  प्रवाशांसह चालक व वाहकाला बस जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितल़े जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक सुनील गायकवाड यांच्यासह कर्मचारी ललित पाटील, शेखर जोशी, तुषार झंवर यांनी बिरहारी यांच्या सांगण्यानुसार बसमधील प्रवाशांची चौकशी केली़ मात्र यात कुणाजवळ पैसे आढळून आले नाही़प्रवाशांच्या चौकशीदरम्यान विनोद चव्हाण या प्रवाशावर पोलिसांना संशय आला मात्र त्याची झडती घेतली असता पैसे आढळून आले नाही़ यादरम्यान शेखर जोशी व तुषार झंवर यांनी बसमधील विद्यार्थिनींना व एका प्रवासी महिलेची विचारपूस केली़ त्यात विद्यार्थिनींनी चव्हाण याने बसमध्ये वरच्या कप्प्यात त्याची बॅग ठेवली व तो मागच्या बाजूस बसायला गेल्याची माहिती दिली़ पोलिसांनी बॅग तपासली असता, त्यात हातरुमाल ठेवलेले 14 हजार रुपये आढळून आल़े यानंतर पोलीस निरिक्षक सुनील गायकवाड यांनी वृध्द बिरहारी यांना त्यांचे पैसे परत केल़े याबद्दल बिरहारी यांनी पोलिसांचे आभार केल़े  याप्रकरणी बिरहारी यांच्या फिर्यादी विनोद  चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े