शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उघड्या घरातून चोरटा मोबा‌इल, रोकड घेऊन पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:13 IST

जळगाव : औद्यागिक वसाहतीतील यश इंडस्ट्रीज येथील नूर मेहंदी हसन यांच्या खोलीतून अज्ञात चोरट्याने तीन मोबाइल व २६ हजार ...

जळगाव : औद्यागिक वसाहतीतील यश इंडस्ट्रीज येथील नूर मेहंदी हसन यांच्या खोलीतून अज्ञात चोरट्याने तीन मोबाइल व २६ हजार ५०० रुपयांची रोकड लांबविल्याची घटना रविवारी मध्यरात्री ३ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

नूर हसन यांच्यासह त्यांचा भाऊ शाहीद अली, अब्दुल मेहंदी हसन व जैेनुल आपुद्दीन हे औद्यागिक वसाहतीतील एका चटई कंपनीत कामाला आहेत. चौघे यश इंडस्ट्रीजच्या एका खोलीत वास्तव्यास आहेत. रविवारी रात्री १ वाजता संपूर्ण काम आटोपून झोपी गेले होते. यादरम्यान खोलीचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्याने त्यांच्या खोलीतून तीन मोबाइल व २६ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेली. दरम्यान, मध्यरात्री ३ वाजता जैनुल आपुद्दीन याला जाग आल्यानंतर त्याला खोलीतून चोरटा पळताना दिसून आला. त्यांनी लागलीच नूर याला उठवून घरात चोरी झाल्याचे सांगितले. खोलीची पाहणी केली असता, त्यावेळीत तीन मोबाइल व शाहीद यांच्या पँटच्या खिशातील रोकड चोरीला गेल्याचे दिसून आले.

अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार

नूर हसन यांच्या इतरांनी खोलीच्या बाहेर धाव घेऊन चोरट्याचा शोध घेतला. काहीवेळ शोध घेऊन सुद्धा तो मिळून आला नाही. सोमवारी नूर यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत रात्री घडलेल्या संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. चोरटा सुमारे चाळीस वर्षे वयोगटांतील असून, काळे जॅकेट व काळी पँट घातलेली असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.