शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपूर्वीच्या नुकसानीची अद्याप भरपाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:11 IST

११ जून २०१९ रोजी तालुक्यातील गिरणाकाठालगत चक्रीवादळ व त्यापाठोपाठ आलेल्या पावसाने ऐन कटाईला आलेल्या केळीबागा भुईसपाट झाल्या होत्या. त्यावर्षी ...

११ जून २०१९ रोजी तालुक्यातील गिरणाकाठालगत चक्रीवादळ व त्यापाठोपाठ आलेल्या पावसाने ऐन कटाईला आलेल्या केळीबागा भुईसपाट झाल्या होत्या. त्यावर्षी भीषण दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांनी या बागा जगवल्या होत्या. त्या वादळाने उद‌्ध्वस्त केल्याने, हातातोडांशी आलेला घास मातीला मिळाला. त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी यांनी वादळग्रस्त गावोगावी जाऊन नुकसानीची पाहणी केली. महसूल व कृषी विभागाला संयुक्त पंचनाम्यांचे आदेश दिले. शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.

या वादळात तालुक्यातील आठशेवर शेतकऱ्यांच्या पाचशे हेक्टर केळीबागा व शंभर हेक्टरवर लिंबू, मोसंबी, डाळिंब बागांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. यात केळीबागायतदारांचे सर्वाधिक नुकसान झाले होते. एका-एका शेतकऱ्याचे लाखापासून ते पंधरा-वीस लाखांपर्यंत नुकसान झाले. शासकीय पंचनामे झाल्याने नुकसानभरपाई मिळेल, ही आशा शेतकऱ्यांना लागून होती. मात्र दोन वर्षे होत आले तरी कवडीमात्र मदत न मिळाल्याने आपल्या तोंडाला नुसती पाने पुसली गेल्याची भावना या शेतकऱ्यांमध्ये झाली आहे.

दोन वर्षांपूर्वी ११ जूनला वादळाने केळीबागा होत्याच्या नव्हत्या झाल्या. तत्कालीन पालकमंत्री,आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, कृषी अधिकारी दौऱ्यावर आले. त्यांच्या समक्ष पंचनामे झाले. तत्काळ नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन अद्याप हवेतच विरले आहे. सरकार बदलले. आमदार-खासदार तेच आहेत. आमदार किशोर पाटील यांनी यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्याचे सूतोवाच अनेकदा केले. मात्र तालुका अजूनही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहे.

-दीपक संभाजी महाजन, अध्यक्ष,

रा. काँ. किसान सेल, पिचर्डे, ता. भडगाव