शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर तालुक्यात टंचाई कायम, ५६ गावांना अजूनही टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 20:30 IST

अमळनेर : पावसाळा सुरू होऊन २० दिवस उलटले. मात्र, तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य अद्यापही कायम असल्याची सद्य:स्थिती आहे. पुरशा पावसाअभावी ...

अमळनेर : पावसाळा सुरू होऊन २० दिवस उलटले. मात्र, तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य अद्यापही कायम असल्याची सद्य:स्थिती आहे. पुरशा पावसाअभावी जूनअखेरदेखील ५४ गावांना ३६ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच शहरात १५ दिवसांनी पाणी मिळत असून अग्निशामक दलाच्या बंबांनी पाणी पुरविण्याची कसरत नागरपालिकेला करावी लागत आहे.अमळनेर तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने भूजल पातळी खालावलेलीच आहे. विहिरी, बोअर आटले आहेत. नैसर्गिक नियमाप्रमाणे जूनअखेरपर्यंत पाऊस पुरेसा पडतो. त्यामुळे शासनातर्फे टँकर बंद केले जातात. मात्र तालुक्यातील ५४ गावांची परिस्थिती आहे तशीच असल्याने टँकर कमी झालेले नाहीत. जानवे, शिरसाळे, डांगरे, पिंपळे खुर्द, निसर्डी, वाघोडा, शिरूड, नगाव बुद्रूक, भोरटेक, धानोरा, मांजर्डी, कचरे, झाडी, इंदापिंप्री, कावपिंप्री, जैतपीर, भरवस, लोणपंचम, आटाळे, पिंपळे बुद्रूक, अनचलवाडी, गलवाडे बुद्रूक , गलवाडे खुर्द, आर्डी, आनोरे, खेडी, खरदे, वासरे, सबगव्हान, खेडी प्रगणे जळोद, पिंपळी प्र.ज., मालपूर, खोकरपाट, मंगरूळ नगाव खुर्द, धुपी, बोरगाव, गोवर्धन, सारबेटे बुद्रूक, फापोरे बुद्रूक, हेडावे, सुंदरपट्टी, मारवड, बिलखेडे, जानवे, फापोरे खर्दु, तळवाडे, मांजर्डी गडखांब, खडके, वाघोदा, ढेकू खुर्द, ढेकू बुद्रूक तांडा, देवगाव देवळी, कोंढावळ, जैतपीर, खेडी व्यवहारदळे, कुर्हे सीम, नांद्री या गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जाते. पाणी पातळी प्रमाणाबाहेर खालावली असल्याने तालुक्यात जोरदार पावसाची अपेक्षा आहे.