शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील गाळे ताब्यात घेण्यास आडकाठी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 11:22 IST

शासनाच्या नगर विकास विभागाचे स्पष्टीकरण : मनपा केव्हाही सुरु करु शकते प्रक्रिया

ठळक मुद्देगाळेधारकांकडे असलेल्या थकबाकीवर रेडिरेकनरच्या दराने पाच पट दंड आकारणीसाठी महासभेत ठरावमनपाच्या या ठराव क्रमांक 40 विरुद्ध व्यापा:यांनी राज्यशासनाकडे दाद मागितली होती कक्ष अधिका:यांनी मनपाला गाळ्यांबाबत स्पष्टीकरण दिले

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 4 -  शहरातील 18 व्यापारी संकुलांमधील गाळे रिकामे करून  ताब्यात घेण्यास मनपास शासनाकडून कोणतीही आडकाठी नाही. ही प्रक्रिया महापालिका केव्हाही सुरू करू शकते.  शासनाकडे निर्णयासाठी प्रलंबित ठरावांची माहिती विभागीय आयुक्तालयातील नगरविकास विभागामार्फत लवकरात लवकर सादर करावी अशा सूचना नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी सु.द. धोंडे यांनी मनपा प्रशासनास गुरूवारी  दिल्या. महापालिकेच्या 18 व्यापारी संकुलांमधील 2147 गाळ्यांचा करार 2012 ला संपल्यानंतर महापालिकेने मुदत संपलेल्या या  व्यापारी संकुलांमधील गाळ्यांचा लिलाव करण्यासाठी तसेच गाळेधारकांकडे असलेल्या थकबाकीवर रेडिरेकनरच्या दराने पाच पट दंड आकारणीसाठी महासभेत ठराव केला होता. मनपाच्या या ठराव क्रमांक 40 विरुद्ध व्यापा:यांनी राज्यशासनाकडे दाद मागितली होती. राज्य शासनाने या ठरावाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात    चार वेगवेगळया याचिकांवर   न्या. सुबोध धर्माधिकारी व न्या. मंगेश पाटील यांच्या बेंचसमोर एकत्रित कामकाज सुरू होते. या द्विसदस्य बेंचने  14 जुलै रोजी हे गाळे दोन महिन्यात रिकामे करून घेण्याचे तसेच राज्य शासनाला मनपाच्या या प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप करू नये असे आदेश दिले होते. त्यानंतर कक्ष अधिका:यांनी मनपाला गाळ्यांबाबत स्पष्टीकरण दिले आहे.या ठरावांबाबत मागितली माहिती; तोर्पयत प्रक्रिया थांबवू नका गाळेकरारासंदर्भात राज्य शासनाकडे निर्णयासाठी प्रलंबित असलेले ठराव क्रमांक 40 व 135 सह विविध विषयांवर राज्य शासनाने दोन महिन्यात निर्णय घ्यावयाचे आहेत. या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी या ठरावांबाबतची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाकडील नगर विकास विभागामार्फत राज्य शासनाकडे तातडीने पाठवायची आहे. ठरावांची माहिती व त्या संदर्भातील प्रलंबित विषयांचे पत्र तातडीने पाठवावे अशा सूचनाही धोंडे यांनी दिल्या. ठरावांवर शासन निर्णय घेईल मात्र तोर्पयत कोणतीही प्रक्रिया थांबवू नये असेही त्यांनी सूचित केले. दरम्यान,  केव्हाही गाळे ताब्यात घेण्याची टांगती तलवार असल्याने गाळेधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

उच्च न्यालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार महापालिका 18 व्यापारी संकुलांमधील गाळे केव्हाही रिकामे करून घेऊ शकते. या प्रक्रियेस शासनाकडून कोणतीही आळकाठी नाही असे  शासनाच्या नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी   सु.द. धोंडे यांनी आज स्पष्ट केले आहे. महापालिकेकडून या संदर्भात सुरू असलेल्या कामकाजाची माहितीही त्यांनी घेतली. 

राज्य शासनाच्या नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी सु.द. धोंडे यांनी गुरुवारी महापालिकेत संपर्क साधला. न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत त्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी काही सूचना केल्या आहेत. तसेच महापालिकेकडून काही कागदपत्रेही मागविली आहेत. त्याबाबतची माहिती शुक्रवारी त्यांना पाठविण्यात येणार   आहे. -किशोर राजे निंबाळकर, प्रभारी आयुक्त,  मनपा

शासनाच्या नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी धोंडे यांनी न्यायालय निर्णय, त्याची अंमलबजावणी व शासनाकडे प्रलंबित असलेल्या            विषयांची माहिती आज  घेतली. त्यांनी सूचना केल्यानुसार दोन दिवसात विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत ठरावांची माहिती पाठविली जाईल.           गाळे रिकामे करून घेण्याबाबतच्या प्रक्रियेस आडकाठी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. -लक्ष्मीकांत कहार, उपायुक्त.